नागपूरात करोनाची तिसरी लाट, कडक निर्बंधांचे संकेत 

विकेंड लॉकडाऊनची शक्यता

रेस्टॉरंट आणि दुकानाच्या वेळा कमी करण्याचे संकेत

नागपूर: वाढत्या गर्दीमुळे नागपूर येथे करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर ऐन सणासुदीला नागपुरात येत्या दोन -तीन दिवसात कडक निर्बंध लावण्यात येणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी आज याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे नानागपूरात करोनाची तिसरी लाट आल्याचे स्पष्ट झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांची संख्या नागपुरात वाढत असल्याने चिंतेचा विषय बनली आहे. या पार्श्वभूमीवर नितीन राऊत यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना राऊत यांनी कडक निर्बंधांचे सुतोवाच केले.

 

Leave a Reply

%d bloggers like this: