ऊस दरवाढ आंदोलन पेटणार शरद पवारांच्या बारामती मधून – अतुल खूपसे पाटील

पुणे: ऊस वाहतूक दर व उसाच्या दराबाबत सविस्तरपणे दर जाहीर केल्याशिवाय कुठल्या साखर कारखाना सुरू होऊ देणार नाही. त्यामुळे परिस्थिती उद्भवेल वचन नुकसान होईल त्यात मी जबाबदार राहणार नाही .यावर्षीचे ऊस दर आंदोलन शरद पवारांच्या बारामती मधून सुरू होईल असा इशारा जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत दिला.

अतुल खूपसे पाटील म्हणाले, 2016 2017 साला पासून वाहतूक दरामध्ये कुठलीही वाढ झाली नाही त्यावेळेस डिझेल तर दोनशे रुपये प्रतिलिटर होता आणि जवळपास शंभर रुपये प्रतिलिटर झाला आहे तरी कारखानदार त्यांना दरवाढ देण्यास तयार नाही शेतकरी जोडधंदा म्हणून शेतकरी ऊस वाहतूक व्यवसाय करत आहे वाहतुकीच्या वाहनांची संख्या जास्त असल्याचे कारण देत कारखानदार गैरफायदा घेत आहेत वाहन घरी ठेवून शेतकऱ्यांना परवडत नाही वाहतूक करून तोटा होतो अशा अवस्थेमध्ये शेतकरी सापडला आहे पूर्वी वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्याच्या रकमा दिला जायचा आता तर काही कारखाने ऍडव्हान्स सुद्धा देत नाही.

ते पुढे म्हणाले, शेतकऱ्यांनी कारखान्यास ऊस घातल्यानंतर त्यांना किती दर मिळणार किती टक्के मिळणार हे कधीच माहिती नसते .त्याला आपल्या शेतातील ऊस लवकरात लवकर तोडून कारखान्यात घालने एवढेच त्यांचे ध्येय असते .या गोष्टीचा गैरफायदा कारखानदार घेतात .त्यामुळे आपण कारखान्यात पुरविलेल्या उसाला किती दर मिळणार व कितपत किती काळजी मिळणार आहे. त्या शेतकऱ्यांना माहिती असणे गरजेचे आहे म्हणून माझी साखर आयुक्त सर्व साखर कारखानदार यांना विनंती आहे. की आपण बॉयलर प्रतिपदेच्या दिवशी उसाच्या दराच्या बाबतीत धोरण जाहीर करावे अशी विनंती त्यांनी केली.

Leave a Reply

%d bloggers like this: