डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी स्वीकारली भारतीय शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदाची सूत्रे

पुणे : मा सहा. धर्मादाय आयुक्त, पुणे विभाग यांनी ‘भारतीय शिक्षण संस्थेच्या’ संदर्भात गेली अडीच वर्षे सुरू असलेल्या अंतर्गत वादा बाबत १ सप्टें २१ रोजी अंतिम निर्णय दिला. या निर्णया नुसार प्रा अरूण अडसूळ यांचा तथाकथित अध्यक्ष म्हणून केलेला दावा व त्यांच्या सोबत असलेल्या सर्व तथाकथित विश्वस्ताची स्वयंघोषीत निवड व नियुक्त्या संपुर्णपणे बेकायदेशीर ठरवली आहे.. त्याच प्रमाणे जानेवारी २०१९ पर्यंत अस्तीत्वातील संस्थेच्या मुळ घटनेनुसार सर्व प्रक्रिया पूर्ण करून संस्थेचे अध्यक्ष म्हणून (नियोजन आयोगाचे माजी सदस्य, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू) अर्थतज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर व त्यांच्या बरोबर असलेले पदाधिकारी आणि विश्वस्त यांची झालेली निवड / नियुक्ती कायदेशीररीत्या वैध ठरवली आहे.

या निर्णयास अनुसरून डॅा मुणगेकर यांनी आज ( दि ६ सप्टें ) रोजी ‘भारतीय शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष’पदाची सुत्रे स्वीकारली.. त्यांचे समवेत उपाध्यक्ष प्रा नागनाथ कोतापल्ले, विश्वस्त प्रा शरद जावडेकर आणि सचिव डॉ. बी एन कांबळे उपस्थित होते. डॉ. मुणगेकर व पदाधिकाऱ्यानी डॉ. जे पी नाईक व डॉ. चित्रा नाईक यांचे स्मारकास पुष्पहार घालून अभिवादन केले व सुमनांजली वाहीली..! या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्त्यांनी डॉ. मुणगेकर सर व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या..!

Leave a Reply

%d bloggers like this: