कोरोनाच्या काळात श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त झाली – डाॅ. मोहन आगाशे

पुणेः- करोनाच्या काळात लाॅकडाऊन मुळे अनेकांचे मुळ व्यवसाय बदलले. उपजिविकेसाठी अनेकांना त्यांच्या मुळ व्यवसायाला बगल देत बाजारपेठेची जी मागणी आहे त्यानुसार उत्पादने विकसीत करुन ती बाजारात विकावी लागत आहे. अशी परिस्थिती असली तर कोरोना काळात श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त झाली असे म्हणता येईल, असे मत ज्येष्ठ सिने-नाट्य कलाकार आणि प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डाॅ. मोहन आगाशे यांनी व्यक्त केले.

संवाद पुणे आणि कृष्णकुमार गोयल फाैंऊडेशनच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रात प्रथमच पुण्यातील नाट्यगृहांच्या माहिती असलेल्या संवाद नाट्यगृहांशी या पुस्तिकांचे ज्येष्ठ सिने-नाट्य कलाकार आणि प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डाॅ. मोहन आगाशे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. संवाद पुणेचे सुनील महाजन यांची ही मुळ संकल्पना होती.

यावेळी व्यासपीठावर संवाद पुणे संस्थेचे सुनील महाजन,कृष्णकुमार गोयल फाैंऊडेशन आणि कोहिनूर उद्योग समुहाचे संचालक कृष्णकुमार गोयल,अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकीता मोघे उपस्थित होते.

डाॅ. मोहन आगाशे म्हणाले, नाट्यगृह बंद असतांना हे उपयुक्त पुस्तक प्रकाशित होत आहे हा विरोधाभास आहे. या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने का होईना नाट्यगृह आता खुली झाली पाहिजेत. कोरोना आरोग्याशी निगडीत समस्या असली तरी मी ह्याच्याकडे निसर्गाने मानवजाती कडे पाठविलेला संवाददाता च्या रुपात पाहतो. निसर्गाने दिलेली चेतावनी मानवाने वेळीच ओळखणे गरजेचे आहे. कोरोनाचा बागूल बुवा आला रे आला अशी गत न करता आपल्याला भविष्यात कोरोना सोबतच जगण्याची सवय करुन घेणे आवश्यक आहे.

कृष्णकुमार गोयल म्हणाले, हे पुस्तक म्हणजे नाट्यगृहांची संकलीत आणि एकत्रीत माहिती असलेला मोठा दस्तावेजच आहे. नाट्यगृहांची उपलब्धता आणि नाट्यगृहांचे नियम-अटी, आसन क्षमता आदी सर्व गोष्टींनी परिपूर्ण असे हे उपयुक्त पुस्तक आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक वेळी सभागृहात प्रत्यक्ष जाऊन माहिती घेणे शक्य नसल्याने अशा सर्व व्यक्ति आणि संस्थासाठी घरबसल्या हा दस्तावेज पुस्तक रुपाने उपलब्ध झाल्याने सर्वांचीच मोठी सोय झाली आहे.

यावेळी करोना काळात उपजिवेकेसाठी बॅक स्टेज कलाकारांनी केलेल्या उपक्रमशीलतेतून निर्माण केलेल्या पणत्यांचे प्रात्यक्षिक डाॅ. मोहन आगाशे यांनी सादर केले.

संवाद पुणे संस्थेचे सुनील महाजन यांनी प्रास्ताविक केले तर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकीता मोघे यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: