Pune – गेल्या 24 तासात 165 नवीन कोरोनाचे रुग्ण तर 252 रुग्णांना डिस्चार्ज

पुणे: शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. परंतु आज रुग्णांची कमी  असून आज शभंर च्यावर रुग्ण आढळून आले आहेत. पुणे शहरामध्ये  गेल्या 24 तासात 165नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 252रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 96हजार 937 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 85हजार 817इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 16रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 4तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 12रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8953जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शहरामध्ये सध्या 2167रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. त्यापैकी 211रुग्ण गंभीर आहेत आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 6097 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: