आरोग्यसेवेमध्ये जगाचे नेतृत्व करण्याची आयुर्वेदामध्ये ताकद

पुणे : आयुर्वेद हे आपल्यासाठी एक शस्त्र आहे. त्याचा योग्य पद्धतीने वापर व्हायला हवा. आयुर्वेद म्हणजे सामान्यतः औषधे आणि पंचकर्म प्रक्रियेद्वारे उपचार म्हणून पाहिले जाते. परंतु आयुर्वेद हे जीवनशास्त्र आहे. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक विकारांच्या प्रतिबंध आणि उपचारांसाठी आयुर्वेद ही संपूर्ण जीवनशैली आहे. आयुर्वेदाचे मूळ तत्व तसेच ठेऊन त्याचे काळानुरुप स्वरुप बदलायला हवे, कारण आरोग्यसेवेमध्ये जगाचे नेतृत्व करण्याची ताकद आपल्या प्राचीन आयुर्वेदामध्ये आहे. असा सूर पुण्यामध्ये आयोजित  राज्यस्तरीय वैद्यकीय परिषदेत उमटला.

हेम्प स्ट्रीट आणि डॉ.कामठे पाईल्स क्लिनिक  यांच्यावतीने पुणे रेल्वे स्थानकाजवळील लेमन ट्री सिटी सेंटर येथे  त्रैलोक्य विजया वटी या वेदनाशामकाचा निरीक्षणात्मक अभ्यास यावर वैदयकीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील विविध डॉक्टरांनी यामध्ये सहभाग घेतला आणि मानवी आरोग्यासाठी आयुर्वेदाचे महत्त्व याबाबत आपले विचार व्यक्त केले. तसेच क्षारकर्म , क्षारसूत्र उपचारानंतर रुग्णांमध्ये पोस्ट-ऑपरेटिव्ह वेदनांमधे त्रैलोक्य विजया वटीच्या विश्लेषणात्मक प्रभावाचे मूल्यांकन-एक निरीक्षणात्मक अभ्यास या विषयावर डॉक्टरांनी आपले संशोधन सादर केले.

यावेळी डॉ. कुणाल कामठे, डॉ. विक्रांत पाटील, डॉ. अनिरुद्ध मोहिते, डॉ.नीरज कामठे, वैद्य  सुकुमार सरदेशमुख, हेम्प स्ट्रीटचे सहसंस्थापक श्रेय जैन, डॉ.महेश संघवी, डॉ. योगेश्वर पवळे, डॉ. ओंकार कुलकर्णी, उपस्थित होते.

डॉ. कुणाल कामठे म्हणाले, जगातील सर्वात परिणामकारक वेदनाशामक आयुर्वेदाकडे आहे. पण ते वापरण्याचा परवाना आपल्याकडे नाही. त्यामुळे त्रैलोक्य विजया वटी हे वेदनाशामक रुग्णांसाठी वरदान आहे. पूर्वीच्या काळी, विजया हे विविध प्रकारच्या रुग्णांमध्ये वेदनाशामक म्हणून वापरली जात होती. विजयाचे वेदनशामक गुणधर्म लक्षात घेता, शस्त्रक्रियेनंतरच्या वेदना कमी करण्यासाठी देखील याचा वापर होऊ लागला.

हेम्प स्ट्रीटचे सहसंस्थापक श्रेय जैन म्हणाले, हेम्प स्ट्रीटच्या त्रैलोक्य विजया वटीच्या सुरक्षिततेचे आणि प्रभावीतेचे मूल्यमापन करण्यासाठी वैद्यकीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. कॅन्सरमधील वेदना, मायग्रेन, सांधे दुखी, निद्रानाश यांसह कोणत्याही प्रकारच्या वेदनांमध्ये त्रैलोक्य विजया वटीचा उपयोग परिणामकारक असल्याचे डॉक्टरांच्या अभ्यासातून निष्कर्ष काढण्यात आला.

Leave a Reply

%d bloggers like this: