राष्ट्रीय स्तरावर ही पुणेकरांची मान उंचावेल असे काम करेन – महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे: पुण्यनगरीचे प्रथम नागरिक महापौर मुरलीधर मोहोळ यांनी कोरोना काळात उत्तम काम केले असून त्यांच्या कार्याचे विरोधकांनी सुद्धा कौतुक केले. अश्या कर्तृत्ववान महापौरांची राष्ट्रीय महापौर परिषदेच्या उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करत असताना त्यांना भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो असे गौरवोदगार भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी काढले.

यावेळी संघटन सरचिटणीस राजेश पांडे, प्रदेश सचिव अरविंद निलंगेकर,शहर प्रवक्ता संदीप खर्डेकर, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, इ मान्यवर उपस्थित होते. हा पुणेकरांचा बहुमान असून मी राष्ट्रीय स्तरावर ही पुणेकरांची मान उंचावेल असे काम करेन असे महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: