fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsNATIONAL

रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्ही आणि भारतीय नौदलाचा द्विपक्षीय सराव – `ऑसिन्डेक्स`

नवी दिल्‍ली : भारतीय नौदलाच्या टास्क ग्रुपमध्ये सहभागी असलेले जहाज शिवालिक आणि कदमत, पूर्व ताफ्याचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग, रियर अडमिरल तरूण सोबती, व्हीएसएम यांच्या नेतृत्वाखाली, 6 ते 10 सप्टेंबर 21 दरम्यान होणाऱ्या ऑसिन्डेक्सच्या (AUSINDEX) चौथ्या आवृत्तीत भाग घेत आहेत. रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्ही (RAN) अनझॅक क्लास गेट, एचएमएएस वारामुंगा ज्यांनी भारतीय नौदलासह मलाबार सरावात भाग घेतला होता, ते  या सरावात सहभागी होत आहेत. या ऑसिन्डेक्सच्या आवृत्तीमध्ये जहाज, पाणबुडी, हेलकॉप्टर आणि सहभागी नौदलांच्या लांब पल्ल्याच्या सागरी गस्तीच्या विमानांमधील हवाई ऑपरेशन्स यांचा समावेश आहे.

सहभागी होणारी भारतीय नौदलाची जहाजे शिवालिक आणि कदमत ही अनुक्रमे अत्याधुनिक स्वदेशी बनावटीची आणि तयार केलेले मार्गदर्शित क्षेपणास्त्र स्टील्थ फ्रिगेट आणि अँटी सबमरीन कॉर्वेट पद्धतीचे आहेत. ती पूर्व नौदल कमांड अंतर्गत विशाखापट्टणम येथे स्थित भारतीय नौदलाच्या पूर्व ताफ्याचा एक भाग आहेत. भारतीय नौदलाची द्विपक्षीय सागरी कसरत म्हणून 2015 मध्ये सुरू झालेल्या ऑसिन्डेक्स मधील सहभाग गेल्या काही वर्षांत वाढत राहिला आहे आणि 2019 मध्ये बंगालच्या उपसागरात आयोजित केलेल्या सरावाच्या तिसऱ्या आवृत्तीत प्रथमच पाणबुडीविरोधी सरावांचा समावेश केला आहे.

चौथ्या आवृत्तीमध्ये, दोन्ही देशांची जहाजे एचएएमएस रॅनकिन, या  ऑस्ट्रेलियाच्या पाणबुडी समवेत तसेच रॉयल ऑस्ट्रेलियन एअर फोर्स P-8A आणि F-18A विमान यांच्याबरोबरच हेलिकॉप्टर्ससह सराव करतील. या सरावामुळे दोन्ही नौदलांना आंतर-कार्यक्षमता वाढविण्याची, सर्वोत्तम पद्धतींमधून लाभ मिळविण्याची आणि सागरी सुरक्षा ऑपरेशन्ससाठी प्रक्रियेची  समज विकसित करण्याची संधी मिळेल.

हा सराव 18 ऑगस्ट 21 रोजी भारतीय नौदलाचे नौदल प्रमुख, आणि ऑस्ट्रेलियाचे नौदल प्रमुख  यांच्यात झालेल्या समझोत्याचे प्रतिनिधित्व आहे. हा महत्त्वाचा दस्तऐवज दोन राष्ट्रांमधील `2020 व्यापक धोरणात्मक भागीदारी`शी संबंधित आहे, आणि हिंद – प्रशांत क्षेत्रातील शांतता, सुरक्षा आणि स्थिरतेला प्रोत्साहन देणाऱ्या प्रादेशिक आणि जागतिक सुरक्षेबाबतच्या आव्हानांची सामायिक बांधिलकी आणखी दृढ करण्याच्या उद्देशाने करण्यात आला आहे. कोविड निर्बंध असूनही या सरावाचे आयोजन हे सहभागी नौदलांमधील विद्यमान समन्वयाची साक्ष देणारे आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading