Saturday, June 13, 2026
Latest NewsNATIONAL

नौदलाच्या हवाई विभागाला प्रेसिडेंट्स कलर प्रदान

नवी दिल्‍ली : राष्ट्रपती आणि तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज गोव्यात आयएनएस हंसा इथे भारतीय नौदलाच्या हवाई विभागाला राष्ट्रपतींचा ध्वज (प्रेसिडेंटस कलर) हा सन्मान प्रदान करण्यात आला. या विशेष कार्यक्रमानिमित्त, 150 जवानांनी पथसंचलन करत राष्ट्रपतींना मानवंदना दिली. यावेळी गोव्याचे राज्यपाल पी.एस. श्रीधरन, मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक, नौदल प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंह, व्हाईस अॅडमिरल पी हरी कुमार, (फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ पश्चिम नौदल कमांड) आणि रीयर अॅडमिरल फिलीपोज जी प्युमोटील यांच्यासह मान्यवर  यावेळी उपस्थित होते.

देशात युद्ध आणि शांतता अशा दोन्ही काळात, देशाची अद्वितीय सेवा करणाऱ्या लष्करी विभागाला प्रेसिडेंट्स कलर सन्मान प्रदान केला जातो. नौदलाच्या हवाई विभागाने गेल्या सात वर्षात, आपल्या शौर्य आणि उल्लेखनीय सेवा देत, आपला ठसा उमटवला आहे. भारतीय सैन्यदलात पहिले प्रेसिडेंट्स कलर सन्मान मिळवण्याचा मान भारतीय नौदलाने पटकावला आहे. देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते 27 मे रोजी 1951 रोजी त्यांना हा प्रदान करण्यात आला. त्यानंतर, नौदलाच्या दक्षिण नौदल कमांड, पूर्व नौदल कमांड, पश्चिम नौदल कमांड, पश्चिम ताफा, पाणबुडी विभाग, आयएनएस शिवाजी आणि भारतीय नौदल अकादमी यांना हे पुरस्कार मिळाले आहेत.

भारतीय नौदलाच्या हवाई विभागाला मिळालेला हा सन्मान म्हणजे, त्यांनी शांतता आणि युद्धजन्य परिस्थितीत त्यांनी दिलेल्या सेवेला मिळालेली पावती होय. 1951 साली अस्तित्वात आलेल्या या विभागात, पहिल्यांदा सीलँड एअरक्राफ्ट समाविष्ट करण्यात आले होते, त्यानंतर 11 मे 1953 रोजी कोची येथे आयएनएस गरुड समाविष्ट करण्यात आले. आज नौदलाच्या  या ताफ्यात, नऊ हवाई तळे आणि तीन किनाऱ्यांवर  तीन नौदल एअर एनक्लेव्ह आणि अंदमान निकोबार ला एक अशी संपदा आहे.

गेल्या सात दशकात हा विभाग, एक अत्याधुनिक तंत्रज्ञानदृष्ट्या आद्ययावत आणि उच्च क्षमता असलेले दल म्हणून विकसित झाला आहे. यात, 250 पेक्षा अधिक लढावू विमाने, सागरी टेहळणी विमाने, हेलिकॉप्टर्स अनाई रिमोटद्वारे संचालित लढावू विमाने यांचा समावेश आहे. आज नौदलाच्या या हवाई सामर्थ्यच्या बळावर एखाद्या मोहिमेची पूर्ण जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली जाऊ शकते. नौदलाचा हवाई विभाग, हा भारतीय नौदल-लष्करी,मुत्सद्दी, पोलीस आणि इतर अनेक मोहिमांसाठी महत्वाचा घटक सिद्ध झाला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading