‘नागरी दारिद्र्य निर्मूलनात क्षेत्र सभेचे महत्व’ विषयावरील चर्चासत्राला प्रतिसाद

पुणे : ‘नागरी दारिद्र्य निर्मूलन प्रश्नात क्षेत्र सभेचे महत्व ‘ या विषयावर सोमवारी ६ सप्टेंबर रोजी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते,या चर्चासत्राला चांगला प्रतिसाद मिळाला.

इनक्रेडिबल समाजसेवक गृप, क्षेत्रसभा समर्थन मंच पुणे,जन आंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय आयोजित हे चर्चासत्र सोमवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी सायंकाळी 8 वाजता आयोजित केले होते. 74 व्या घटना दुरुस्ती नुसार कलम 243/11 हे नागरी दारिद्र्य निर्मूलनसंबंधी असल्याने रोजगार निर्मिती करण्यात क्षेत्र सभेचे महत्व ‘ या विषयावर चर्चा सत्र झाले. सामाजिक कार्यकर्ते संजय मं.गो.,​​एड .अल्लाउद्दीन शेख यांनी मार्गदर्शन केले. असलम इसाक बागवान यांनी सुत्र संचालन केले.

संजय मं. गो.म्हणाले,’नागरी सुविधा पुरविण्याची जबाबदारी ही पालिकांची आहे.महानगराचे बकालीकरण थांबण्यासाठी क्षेत्रसभा आणि नागरी अधिकारांचा नागरिकांनी उपयोग केला पाहिजे. सर्व कामे आणि निर्णयप्रक्रिया नगरसेवकांवर न सोडता कायद्याचे ज्ञान घेऊन उपयोग केला पाहिजे.नागरिकांच्या अपेक्षांचे प्रतिबिंब निर्णय प्रक्रियेत पडले पाहिजे.

अल्लाउद्दीन शेख म्हणाले,’लोकप्रतिनिधींना निधीची तरतूद करण्याचा अधिकार आहे ,मात्र ,निधी खर्च करण्याची निर्णय प्रक्रिया त्यांच्याकडे असंवैधानिक पद्धतीने येते.संविधानाने आमदार​,​ खासदार आणि नगरसेवक यांना निधी दिलेला नाही​.​ निधी घेणे हे असंविधानीक आहे​. या निधीचे ते केवळ विश्वस्त आहेत​, म्हणून त्यांनी निधीच्या उपयोजनासाठी नागरिकांना विश्वासात घेतले पाहिजे’.

असलम बागवान यांनी क्षेत्रसभेची संकल्पना ,अधिकार यांची माहिती दिली. पुण्यात प्रभागांमध्ये वॉर्ड सभा होण्यासाठी सुरु असलेल्या आंदोलनाची माहिती दिली. कौशल्य विकासातून रोजगार निर्मिती करण्याकडे पालिकांनी भर दिला पाहिजे असेही बागवान यांनी सांगितले .

Leave a Reply

%d bloggers like this: