कॅफे स्टुडिओजचा नवीन हिंदी क्राईम शो ‘जुर्म का चेहरा’ येतोय तुमच्या भेटीस….

अनेक मराठी आणि हिंदी वेब सिरीज आणि चित्रपटांच्या यशस्वी निर्मितीनंतर कॅफे मराठीचे संस्थापक निखिल रायबोले आणि भूपेंद्रकुमार नंदन डिजिटल विश्वातून टेलिव्हिजन विश्वात एक नवीन हिंदी क्राईम शो घेऊन येत आहेत. कॅफे मराठी आता इतर भाषांच्या निर्मितीकरिता कॅफे स्टुडिओज या नावाने कार्यरत राहणार आहे. कॅफे स्टुडिओजची निर्मिती असलेली ‘जुर्म का चेहरा’ ही नवीन हिंदी क्राईम मालिका ४ सप्टेंबर पासून प्रत्येक शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता ‘द क्यू टीव्ही’ चॅनेल वर प्रसारित होणार आहे. या शो चे होस्ट हिंदीतील नावजलेले अभिनेता किंशुक वैद्य असणार आहेत. या मालिकेचे शूटिंग नाशिक आणि मुंबई मध्ये झाले आहे.

भारतात वेगवेगळ्या राज्यात घडणार्‍या गुन्ह्यांची उकल पोलीस कसे करतात हे या मालिकेत बघायला मिळणार आहे. या मालिकेचे वेगळेपण हे आहे की, गुन्हे जसे गतिशील झाले आहेत आणि त्यांचे स्वरुप कालांतराने बदलत चालले आहे, अशा गुन्हेगारी घटनांचा समावेश यात करण्यात आला आहे. सायबर क्राइम, डेटिंग अॅप फसवणूक, ओळख चोरी, घरफोडी, हिंसा, आमली पदार्थ इत्यादी आधुनिक युगाचे काही गुन्हे आणि त्या गुन्ह्यांची उकल यात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.
या शो बद्दल सांगताना निर्माते निखिल रायबोले आणि भूपेंद्रकुमार नंदन म्हणतात की , ” ‘जुर्म का चेहरा’ हा क्राईम शो आपल्या आजूबाजूला असणारे लोक आणि त्यांचे भिन्न भिन्न प्रकारचे चेहरे यांवर भाष्य करणारा आणि त्या गुन्हेगारी चेहऱ्यांपासून सावध करणारा शो आहे. हा शो तुम्हाला तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या गुन्हेगारी चेहऱ्यांपासून सावध करेल.”
या मालिकेचे दिग्दर्शन विनय सांडिल्य, श्रीप्रसाद पवार आणि प्रविण परब हे करत आहेत. “जुर्म का चेहरा” हा शो प्रेक्षकांना ४ सप्टेंबर पासून प्रत्येक शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता ‘द क्यू टीव्ही’ चॅनेल वर बघता येणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: