भोर तालुक्यातील बेरोजगारांना रोजगार निर्माण परिषद देणार आधार – बाबुराव मदने

पुणे – भोर तालुक्यातील बेरोजगार तरुणांना रोजगार आणि उद्योग उभारणीसाठी विशेष मोहीम राबविणार असल्याचे रोजगार निर्माण परिषदेचे संस्थापक बाबुराव मदने यांनी भोर तालुक्यातील लोकांना आश्वासन दिले .रोजगार निर्माण परिषद ही संस्था संपूर्ण राज्यभर रोजगार आणि उद्योग उभारणीसाठी मदत व सेवा देणारी व उदयोजक घडवणारी सामाजिक संस्था आहे .आजपर्यत संपूर्ण महाराष्ट्रभर या संस्थेने साधारण दोन लाख लोकांना उद्योग उभारून एक नवा इतिहास निर्माण केला आहे.
आज भोर तालुक्यातील विविध गावातील लोक यांच्यासोबत या संस्थेची बैठक झाली त्यावेळी मदने यांनी मार्गदर्शन केले .या वेळी पश्चिम महारष्ट्र रोजगार निर्माण परिषदेचे कार्याध्यक्ष संजय नाना शिळीमकर , कुडले दुर्गाडे गावचे सरपंच भाऊ पोळ ,नथुराम भिलारे ,बाळासाहेब शेडगे ,कोंडीबा कंक ,धोंडीबा कंक यासह विविध गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: