fbpx

लोकांचा जीव वाचवणं हे महत्त्वाचे आहे – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे: जिथं श्रद्धा असते तिथे जाता आलं पाहिजे मात्र तिकडे जर गर्दी वाढली तर कोरोना वाढू शकतो, केंद्राने पत्र लिहल आहे, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं संकट आहे, हे भाजपला माहिती आहे, केंद्राने काय सांगितले ते, परिस्थिती आटोक्यात आली की कुणी सांगायच्या आधी सुरू केलं जाईल.लोकांचा जीव वाचवणं हे महत्त्वाचे आहे असा टोला उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना पुण्यातील पत्रकार परिषदेत लगावला.

पुणे जिल्ह्यात पॉझिटिव्ह रेट हा 4 टक्के आहे. पुणे जिल्ह्यात १८ लाख ८० हजार लसीकरण झाले आहे .जवळपास 7 लाख लस शहर आणि जिल्हयात उपलब्ध होणार आहे.ग्रामीण भागात रुग्णसंख्या जास्त आहे,जिल्ह्यात पाच तालुके आहेत तिकडे रुग्ण जास्त, टेस्टिंग वाढवल्यामुळे रुग्ण वाढलेत. तेथील नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी असे पवार म्हणाले. जवळपास 10 कोटी रुपये लसीकरणासाठी उपलब्ध करून दिले आहेत.शाळा , कॉलेजमध्ये लसीकरण करायचे आहे, त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय.असेही पवार यांनी सांगितले. 

लसीकरनाला लोकांनी भरपुर चांगला प्रतिसा द दिला आहे.लसीकरनाला चांगले यश आले आहे. बजाज फायनास कंपनी ने लस उपलब्ध करून दिली मी त्यांचे आभार मानतो.बजाज ग्रुप नेहमीच सामाजिक काम करत असते.असे अजित पवार म्हणाले. कोरोना मुळे या वर्षी गणेशोत्सव साधा होणार आहे. त्यामुळे या वर्षीही  गणेशोत्सवाला आवर घालण्याची गरज आहे घरगुती गणेशोत्सव साजरा करावा.व कोरोना पसरण्यापासून थांबवा .निर्बंध वाढवणार नाहीत, मोठे गणेशोत्सव साधेपणाने गणेशोत्सव साजरा करणार आहेत, त्यामुळे आहेत तेच निर्बंध असणार आहेत त्यामुळे नागरिकांनी शासनाला सहकार्य करावे असे अजित पवार यांनी नागरिकांना आवाहन केले. रुग्ण वाढलेत तर कठोर निर्णय घ्यावे लागतील असा इशाराही त्यांनी जनतेला दिला.

शाळा सुरू करताना त्या शाळेचे शिक्षक प्रिन्सिपल यांचे लसीकरण आधी करणार. अच्छे दिन आनेवाले है म्हणून लोकांनी या सरकारला निवडून दिले, कोरोनामुळे जनता त्रासली आहे, त्यात केंद्र सरकारने त्यात लक्ष देऊन इंधनाचे दर कंट्रोल मध्ये ठेवले पाहिजेत . असाहीटोला त्यांनी केंद्र सरकारला लगावला. स्विमिंग टक मुळे कोरोना वाढू शकतो त्यामुळे आम्ही स्विमिंग टॅंक सुरू करण्याला आपण परवानगी देत नाही.पुढे जाऊन नियम पाळून निर्णय घेऊ. असे अजित पवार म्हणाले 

Leave a Reply

%d bloggers like this: