fbpx

स्वामी समर्थ मठात गोकुळाष्टमीनिमित्त मयूरपंखांची भव्य आरास

पुणे : मंडईजवळील रामेश्वर चौकातील श्री अक्कलकोट स्वामी महाराज संस्थानच्या श्री स्वामी समर्थ मठात गोकुळाष्टमीनिमित्त मयूरपंखांची आरास करण्यात आली. मोराच्या प्रतिकृती, स्वामी महाराजांकरीता आकर्षक पोशाख, दागिने व श्रीकृष्ण मूर्तीला पुष्पसजावट असे मनोहारी दृश्य मठात पहायला मिळाले.

यावेळी संस्थानचे गजानन जेधे, संदीप होनराव, रवींद्र शेडगे आदी उपस्थित होते. दरवर्षी गोकुळाष्टमी श्रीकृष्ण जन्मोत्सव पाळणा मठात साजरा केला जातो. भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी असते. मात्र, यावर्षी कोविडच्या पार्श्वभूमीवर मठ बंद असल्याने भाविकांनी आॅनलाईन पद्धतीने दर्शन घेतले. प्रख्यात कीर्तनकार ह.भ.प.विश्वासबुवा कुलकर्णी यांचे जन्माचे व काल्याचे कीर्तन झाले.

कमलेश कामठे म्हणाले, श्रावणी सोमवारनिमित्त १०० किलो बर्फीचा नैवेद्य मठात दाखविण्यात आला होता. कोविडच्या पार्श्वभूमीवर मठ बंद असला, तरी देखील बर्फीचा प्रसाद म्हणून मठाबाहेर भाविकांना देण्यात आला. श्रीकृष्ण जन्मसोहळ्याला मठातील सेवेकरी व विश्वस्त मोजक्या संख्येने उपस्थित होते. उत्सव साजरा करताना कोविडविषयी सर्व नियम पाळण्यात आले.

Leave a Reply

%d bloggers like this: