कर्तव्य फाउंडेशनतर्फे लसीकरण योध्दयांचा सन्मान

पुणे: कर्तव्य फाउंडेशनतर्फे पुणे कॅन्टो.बोर्डाच्या स.व.पटेल रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर काम करणाऱ्या डाॅक्टर,आरोग्य सेविका, डाटा एंट्री ऑपरेटर व सुरक्षारक्षक यांना लसीकरण योध्दा सन्मानाने गौरविण्यात आले. निवासी वैद्यकीय अधिकारी डाॅ.उषा तपासे मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात डाॅ.उदय भुजबळ,डाॅ.बंटी धर्मा,सी.ए.अरविंद खंडेलवाल, फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भांबुरे, कार्याध्यक्ष अशोक देशमुख,डॉ.निखील यादव, डाॅ.महेश करेरा,सुनील बाथम आदी उपस्थित होते.
कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यासाठी लसीकरण केंद्रावर डाॅक्टर, आरोग्य सेविका,आरोग्य सेवक व इतर कर्मचाऱ्यांनी अविरतपणे कर्तव्य निभावून जनतेची सेवा केली त्याबद्दल कर्तव्य फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भांबुरे यांनी आपल्या मनोगतातून त्यांचे कौतुक केले तर निवासी वैद्यकीय अधिकारी डाॅ.तपासे यांनी सत्काराबद्दल फाउंडेशनचे आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: