fbpx

साहित्याच्या विविध अंगी परिप्रेक्ष्यातून श्रीमद् भगवद्गीतेचा अभ्यास व्हावाः- गो.बं. देगलुरकर

पुणेः- तरुणांना श्रीमद् भगवद्गीताकडे आकृष्ट आणि प्रवृत्त करण्यासाठी श्रीमद् भगवद्गीतेचा अधिकाधिक अभ्यासकांनी अनुवाद, भावार्थ किंवा भाषांतर असे साहित्यीक स्वरुपे वापरुऩ ती समजण्यात जास्तीत जास्त सुलभ केली पाहिजे, असे मत मुर्ती शास्त्राचे अभ्यासक आणि ज्येष्ठ विचारवंत साहित्यीक गो.बं. देगलुरकर यांनी व्यक्त केले. 

डाॅ. ज्योती रहाळकर लिखित आणि सिग्नेट पब्लिकेशन्स तर्फे प्रकाशित श्रीमद् भगवद्गीतेच्या समश्लोकी ग्रंथ देवबोली ह्या ग्रंथाचे देगलुकर यांच्या हस्ते प्रकाशन झाले त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.यावेळीप्रमुख पाहुणे म्हणुन ज्ञान प्रबोधिनीचे संचालक डाॅ. गिरीश बापट हे उपस्थित होते.तसेच व्यासपीठावर लेखिका डाॅ. ज्योती रहाळकर, डाॅ. जयेश रहाळकर, सिग्नेट पब्लिकेशन्सचे अॅड. प्रमोद आडकर, मैथली आडकर,मृणालिनी खरे आदी मान्यवर उपस्थित होते. 

देगलुरकर म्हणाले, सर्वसाधारणपणे 2000 बोली भाषा आहेत असे मानले जाते त्यापैकी सुमारे शंभर बोली भाषांना मान्यता आहे. त्या प्रत्येक भाषेत श्रीमद् भगवद्गीतेवर काम झाले आहे.श्रीमद् भगवद्गीतेबाबत अनेक मतप्रवाह आहेत. पंरतू ह्या उपर लेखक, विचारवंत, अभ्यासक, साहित्यीक समाजातील आदी बुद्धिवंत घटकांनी त्यांना जशी उमजेल, जशी भावेल तशी ती अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडणे अपेक्षित आहे. लहानमुलांसमोर अधिक प्रमाणात सोप्या पद्धतीने श्रीमद् भगवद्गीता पोहचली पाहिजे. 
डाॅ. गिरीश बापट म्हणाले, अर्जुनाच्या आडून श्रीकृष्णाला जो उपदेश करायचा होतो ते उद्दिष्ट श्रीकृष्णाने श्रीमद् भगवद्गीतेच्या माध्यमातून साध्य केले आहे. अर्जुनाने गोंधळलेल्या अवस्थेत श्रीकृष्णाला जेव्हा प्रश्न विचारला की मी जे राज्य, सुख मिळवू पाहत आहे ते सुख आणि राज्य उपभोगायला माझ्या समवेत माझे अाप्त नसतील तर ते सुख किंवा राज्य मिळविण्यापेक्षा मी भिक्षा मागूऩ उर्वरीत आयुष्य व्यथीत करेल.तेव्हा कृष्णाने त्यास दिलेले उत्तर म्हणजे समग्र जीवनाचे सार आहे. 
सिग्नेट पब्लिकेशन्सचे अॅड. प्रमोद आडकर यांनी प्रास्ताविक केले तर मृणालिनी खरे यांनी सुत्रसंचलन केले. तसेच डाॅ.जयेश रहाळकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. 

Leave a Reply

%d bloggers like this: