छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या जयघोषात दुमदुमला राजगड

पुणे : आग्रा ते राजगड पर्यंत १२५० किलोमीटर शिवज्योत घेऊन पायी निघालेल्या मोहिमेची सांगता राजगडच्या पायथ्याशी खंडोबा माळ्यावर झाली. यावेळी  ढोल ताशांच्या गजरात भंडारा व फुले उधळून सर्व मावळय़ांचे स्वागत करण्यात आले तसेच आग्र्याहून गरुडझेप मोहिमेत सहभागी मावळ्यांचा सन्मान देखील यावेळी करण्यात आला.  पुढील वर्षी १७ ऑगस्ट रोजी ‘ शिवबाची वारी’ हा उपक्रम  एक हजार मावळ्यांना सोबत घेऊन करू असा संकल्प यावेळी मावळ्यांनी केला.  

श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ, पुणे व पाल खुर्द ग्रामस्थ  यांच्या तर्फे आग्रा ते राजगड गरुडझेप मोहिमेचे किल्ले राजगड येथे स्वागत करण्यात आले. किल्ले राजगडावर असलेल्या पदमावती मंदिरात पदमावती देवीच्या पुढे मशाल तेवत ठेवण्यात आली. १७ ऑगस्ट रोजी अॅड. मारुती गोळे यांच्या नेतृत्वाखाली गरुडझेप मोहीम  आग्र्याहून सुरु झाली होती.  

अॅड. मारुती गोळे म्हणाले, आग्र्यावरून औरंगजेबाच्या तावडीतून छत्रपती शिवाजी महाराज निसटलेल्या घटनेस ३५५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ही मोहीम  आयोजित करण्यात आली होती.आग्र्यावरून १७ ऑगस्टपासून सुमारे ६० मावळे  शिवज्योत घेऊन निघाले होते. हे मावळे शिवज्योत घेऊन दररोज १०० ते १२५ किलोमीटर  पायी चालत होते. याचप्रमाणे दरवर्षी १७ ऑगस्ट रोजी शिवबाची वारी ही मोहिम देखील राबविण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

 विलास मोरे, सुमित लिंबोरे, महेश सरपाटील , जाकीर सैय्यद, किशोर चौधरी, विनायक दारवटकर, अशोक सरपाटील, ऋतिक यादव, किरण शेळके, दिग्विजय जेधे, महेश मालुसरे आदी सहभागी झाले होते. विशेषतः नऊ वर्षाचा आयुष देवकर संपूर्ण वारीत सहभागी होता. त्यांच्या सोबत ६० मावळे सहभागी होते.  यावेळी अनेक संस्था व शिवप्रेमी उपस्थित होते. 
वसंतराव प्रसादे , नाना शिर्के, सुर्यकांत भोसले, अजित काळे, अनिरुद्ध हळंदे, संपत चरवड, सुनील वालगुडे, सतीश सोरटे, अभिजित पायगुडे, शशी रसाळ, निलेश बारावकर, गुरुदत्त भागवत, निखिलेश ठाकूर, प्रशांत पायगुडे, रश्मी अनिल मते, मंगेश राव, योगेंद्र भालेराव,  नचिकेत करपे , गणेश बोरकर तसेच मंडळाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. पाली गाव ग्रामपंचायत सदस्य व शिवभक्त मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: