Tokyo Paralympics 2020-21 – अवनीचा सुवर्णवेध, सुवर्ण पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला खेळाडू 

टोकियो : टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या अवनी लेखराने ‘सुवर्णवेध’ साधला आहे. 19 वर्षीय अवनी ही पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. अवनीने 10 मीटर्स एअर रायफलमध्ये 249.6 पॉईंटसह विश्व विक्रमाची बरोबरी करीत सुवर्णपदक पदक जिंकले आहे.

दरम्यान, चीनच्या कुइपिंग झांगने 248.9 पॉईंट मिळवत रजत पदक आणि यूक्रेनच्या इरियाना शेकेत्निकने कांस्य पदक पटकावले. अवनी लेखराने सामन्याची सुरुवात वेगवान केली. तिने 10 पॉईंटसह आपल्या खेळात सातत्य राखलं. स्पर्धेच्या पहिल्या फेरीत केवळ दोन वेळेला अवनीला 10 पॉईंटपेक्षा कमी स्कोअर करता आला. यामुळे ती पहल्या फेरीत दुसऱ्या क्रमांकावर होती. नॉक आऊट राऊंडमध्ये अवनी अव्वल राहिली आणि तिने आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर चांगली मात केली. अखेर 249.6 पॉईंटसह अवनीने सामना जिंकला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखीळ अवणीचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: