‘महिंद्रा’तर्फे नवीन हेवी ड्यूटी रोटाव्हेटर महिंद्रा महाव्हेटर सादर

मुंबई : सुमारे 19.4 अब्ज डॉलरची उलाढाल असलेल्या आणि ट्रॅक्टरच्या उत्पादनात जगात सर्वात मोठ्या असलेल्या महिंद्रा उद्योगसमुहातील ‘महिंद्रा अँड महिंद्रा’ या कंपनीच्या ‘फार्म इक्विपमेंट सेक्टर’ने ‘महिंद्रा महाव्हेटर’ हा नवीन ‘हेवी-ड्यूटी रोटाव्हेटर’ महाराष्ट्रात सादर केला आहे.

नवीन ‘महिंद्रा महाव्हेटर’चा वापर सर्व प्रकारच्या मातीमध्ये केला जाऊ शकतो. तो खासकरून कठीण मातीसाठी, तसेच ऊस व कापसासारख्या पिकांची कापणी झाल्यावर मातीत उरलेले बुडखे काढून टाकण्याच्या दृष्टीने डिझाइन केलेला आहे. या ‘महाव्हेटर’च्या सहाय्याने मातीची कठीण ढेकळे सहज फोडता येतात आणि पिकांच्या निरोगी वाढीसाठी माती बारीक करता येते. ‘महिंद्रा’च्या भारत व युरोपमधील संशोधन व विकास केंद्रांमधून उत्तम दर्जाच्या तंत्रज्ञानासह डिझाइन केलेल्या या ‘रोटाव्हेटर’च्या देशभरात वेगवेगळ्या प्रकारच्या शेतांत व परिस्थितीत चाचण्या घेण्यात आल्या आहेत. तो योग्यता व विश्वसनीयता यांच्या कसोटीस उतरला आहे.

एकाच वेळी ट्रॅक्टर आणि रोटाव्हेटर या दोन्ही गोष्टी खरेदी करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पैशाची व्यवस्था करण्याकरीता ‘महिंद्रा’ने ‘महिंद्रा फायनान्स’शी हातमिळवणी करून 85 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज देण्याच्या सोयीस्कर व आकर्षक कर्जयोजना आणल्या आहेत. ही कर्जाऊ रक्कम ‘रोटाव्हेटर’च्या प्रकारावर अवलंबून असणार आहे. ‘महिंद्रा’ने ‘रोटाव्हेटर’चे अत्यंत टिकाऊ असे ब्लेडही ‘महिंद्रा बोरोब्लेड्स’ या नावाने आणले आहेत. कारखान्यात बनविण्यात येणाऱ्या ‘रोटाव्हेटर’वरही हे ब्लेड्स बसविले जातात आणि सुटे भाग म्हणूनही ते वितरक व दुकानदार यांच्याकडे विकत मिळतात.

‘महिंद्रा महाव्हेटर’च्या सादरीकरणाबाबत बोलताना, ‘एम अँड एम लिमिटेड’चे ‘फार्म मशिनरी’ विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष कैरस वखारिया म्हणाले, “महिंद्रा’ने 10 वर्षांपूर्वी ‘महिंद्रा गायरोव्हेटर’ सादर केले आणि आज आम्ही या श्रेणीतील एक दिग्गज उत्पादक आहोत. यामध्ये तीन हलक्या मातीचे रोटाव्हेटर्स आहेत आणि त्यातील एक ‘महिंद्रा गायरोव्हेटर’ आहे. ‘महिंद्रा महाव्हेटर’ सादर करून आम्ही ‘महिंद्रा’मध्ये हलक्या मातीच्या ‘रोटाव्हेटर्स’च्या बरोबरीने ‘हेवी-ड्यूटी रोटाव्हेटर्स’मध्येही पदार्पण केले आहे.

महाव्हेटर आणि गायरोव्हेटर यांव्यतिरिक्त, ‘महिंद्रा’कडे बागायती, कोरडवाहू जमिनी, वाइनयार्ड आणि फलोद्यानांसाठीही ‘रोटाव्हेटर्स’ची संपूर्ण श्रेणी उपलब्ध आहे. हे रोटाव्हेटर्स 15 एचपी ते 70 एचपी पर्यंतच्या ट्रॅक्टरच्या श्रेणीशी जोडले जाऊ शकतात. महाराष्ट्रातील आमच्या 84 महिंद्रा ट्रॅक्टर वितरकांच्या नेटवर्कद्वारे नवीन ‘महिंद्रा महाव्हेटर’ची किरकोळ विक्री केली जाईल. या वितरकांनी अनेक दशकांपासून विक्रीपश्चात सेवा विश्वसनीय पद्धतीने दिली असून ते शेतकऱ्यांच्या विश्वासास व आदरास पात्र आहेत.

One thought on “‘महिंद्रा’तर्फे नवीन हेवी ड्यूटी रोटाव्हेटर महिंद्रा महाव्हेटर सादर

Leave a Reply

%d bloggers like this: