खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठ्यात दिड टीएमसीची घट

पुणे: खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये सध्या गतवर्षीच्या तुलनेत पाणी साठा कमी आहे.  गतवर्षी 29 ऑगस्ट रोजी प्रकल्पात 47 टीएमसी
पाणी साठा होता.तो या वर्षी सोमवार अखेर 26.30 टीएमसी इतका असून सुमारे दिड टीएमसी तो कमी आहे.अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे अधिकारी विजय पाटील यांनी दिली.

खडकवासला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जुलै महिन्यात चांगला पाऊस पडला. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला चारही धरणे पूर्ण भरण्याच्या मार्गावर होती. परंतु ऑगस्टच्या मध्यानंतर पावसाचा जोर ओसरला .त्यामुळे पाणी साठ्यात काही प्रमाणात घट झाली आहे.
सध्या वरसगाव आणि पानशेत ही दोन्ही धरणे पूर्ण भरलेली आहेत. तर टेमघर धरणात पाणीसाठा 80 टक्क्यांच्या जवळपास आहे. खडकवासला धरणही पूर्ण क्षमतेने भरले होते. परंतु या धरणातील पाणीसाठा निम्म्यावर म्हणजे दीड टीएमसी इतका झाला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: