भारतात बनलेल्या टाटा स्काय सेट टॉप बॉक्सची पहिली बॅच बाजारपेठेत सादर

पुणे : टाटा स्काय या भारतातील आघाडीच्या डीटीएच ऑपरेटर कंपनीने आपल्या दमदार कामगिरीच्या या वर्षात भारतीय बनावटीचे सेट टॉप बॉक्सेस तयार करण्याच्या आपल्या वचनाची पुर्तती केली आहे. आर्थिक वर्ष २०२१ मध्ये केलेल्या घोषणेला अनुसरून टाटा स्कायचे भारतीय बनावटीचे सेट टॉप बॉक्सेस टेक्निकल कनेक्टेड होम आणि फ्लेक्सट्रॉनिक्सच्या भागीदारातून तयार करण्यात आले आहेत. टाटा स्काय आणि टेक्निकलर कनेक्टेड होम यांच्यातील दीर्घकालीन भागीदारीवर हा प्रकल्प आधारला आहे. जगभरातील नेटवर्क सर्विस प्रोव्हायडर्स ना सेट टॉप बॉक्सेस आणि ब्रॉडबँड ऍक्सेस  पर्याय पुरवण्यात ही कंपनी आघाडीवर आहे.

टाटा स्कायसाठी टेक्निकलर कनेक्टेड होमने तयार केलेल्या सेट टॉप बॉक्सच्या मोठ्या प्रमाणावरील उत्पादनप्रक्रियेला जून २०२१ मध्ये चेन्नईत फ्लेक्सट्रॉनिक्सच्या साह्याने झाली. टेक्निकलर कनेक्टेड होम आपल्या उत्कृष्ट पुरवठा साखळीचे लाभ पुरवून टाटा स्कायला भारतीय बाजारपेठेतील सबस्क्राइबर्ससाठी अधिक उत्तम प्रकारची सेवा आणि कस्टमर प्रीमायसेस इक्विपमेंट पुरवण्यात साह्य करत आहे.

टाटा स्कायचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हरित नागपाल म्हणाले  की  भारतीय बनावटीच्या या सेट टॉप बॉक्सच्या निर्मितीतून लीड टाईम कमी होईल आणि त्याचवेळी रोजगारनिर्मितीही होईल. या सेट टॉप बॉक्सच्या दर्जाची चाचणी फॅक्टरी फ्लोअर व्यतिरिक्तही वारंवार करण्यात आली आहे. या प्रयत्नांतून आम्ही भारतीय ग्राहकांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देऊ शकू, अशी आम्हाला आशा आहे.

टेक्निकलर कनेक्टेड होमचे अध्यक्ष मार्टिनेझ-अमागो म्हणाले की ऑगस्ट २०२० मध्ये आम्ही जे उद्दिष्ट मांडले होते त्याची पूर्तता या घडामोडीमुळे झाली आहे. टाटा स्काय आणि टेक्निकल कनेक्टेड होमने अँड्रॉईड टीव्ही बेस्ड बिंज+ सेट टॉप बॉक्सेसह एसटीबीजची निर्मिती आणि वितरण भारतात केले जाईल, अशी घोषणा केली होती. महत्त्वाच्या अशा भारतीय बाजारपेठेच्या प्रगतीतील सातत्यपूर्ण गुंतवणुकीतील हे टेक्निकलर कनेक्टेड होमचे आणखी एक पाऊल आहे.

 

Leave a Reply

%d bloggers like this: