Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALPUNETOP NEWS

छत्रपती शिवाजी महाराजांचा खोटा व चुकीचा इतिहास सांगणाऱ्या राजनाथ सिंग यांनी महाराष्ट्राची माफी मागावी – संभाजी ब्रिगेड

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांना रामदास आणि दादोजी कोंडदेव यांनी खेळाचे शिक्षण दिले असे आजपर्यंत कोणीही लिहिले किंवा सांगितले नाही. हा खोटारडेपणा वेळेत थांबवा. राजनाथ सिंग यांनी हा खोटा इतिहास महाराष्ट्रामध्ये सांगुन तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावण्याचा प्रकार केलेला आहे. खोटा इतिहास आम्ही कधीही मान्य करणार नाही. म्हणून संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी तमाम शिवप्रेमींची तात्काळ माफी मागावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी  केलीआहे.

छत्रपती शिवाजी महाराजांना खेळाचे शिक्षण रामदास व दादोजी कोंडदेव यांनी दिले असे वक्तव्य पुण्यामध्ये देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केले, हे हास्यास्पद व वादग्रस्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात संत रामदासाची कधीही भेट झालेली नाही. समकालीन इतिहासामध्ये सुद्धा तसा कुठलाही पुरावा नाही, हे हायकोर्टाने सुद्धा मान्य केले आहे. चुकीचे पुस्तक वाचून किंवा चुकीची माहिती घेऊन सिंग यांनी चुकीचा इतिहास मांडला. हा जाणीवपूर्वक खोडसाळपणे केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तुत्व नाकारण्यासाठी ‘गुरु’ म्हणून रामदास व दादोजी कोंडदेव हे सांगितले जातात. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वकर्तुत्वावर इतिहास घडवला. आरएसएसच्या तथाकथित इतिहासकारांनी आजपर्यंत खोटे आणि वादग्रस्त इतिहासाचे लेखन केले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बदनाम करण्याचा प्रयत्न केला. ब. म. पुरंदरे यांनीही तेच केले.’ खोटा इतिहास लिहिणाऱ्यांची आणि मानणाऱ्यांची मोठी गँग आहे.’ राजनाथ सिंग यांनी सुद्धा खोटा, चुकीचा इतिहास लष्कराच्या कार्यक्रमांमध्ये सांगून अज्ञानाचे दर्शन दिले. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे अज्ञान आहे.

राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना ढाल, तलवार व इतर खेळाचे ज्ञान दिले. वीर बाजी पासलकर यांनी सुद्धा तलवारबाजी व इतर खेळाची शिक्षण दिले. असे असताना खरा इतिहास सांगितला व लिहिला जात नाही. “इतिहास घडवला मावळ्यांनी परंतु तो लिहिला नाही, लिहीला मनुवादी कावळ्यांनी म्हणून तो सोयीचा लिहिला व सांगितला जातो” हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वकर्तुत्वावर इतिहास घडवला. मात्र त्यांना ‘शूद्र’ ठरवून ‘छत्रपती’ होण्यास विरोध करणारे अर्थात शिवराज्याभिषेक सोहळ्यास विरोध करणारे आज गुरु म्हणून सांगितले जातात… हा इतिहासातील खोडसाळपणातून केलेला भ्रष्टाचार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांना रामदास व दादोजी कोंडदेव यांनी खेळाचे शिक्षण दिले नाही. तसा कोणताही ऐतिहासिक संदर्भ नाही. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग हे खोटं बोलतात. चुकीचे पुस्तक वाचून किंवा चुकीची माहिती घेऊन त्यांनी चुकीचा इतिहास मांडला. त्यामुळे तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. देशाच्या संरक्षण मंत्र्यांनी तात्काळ महाराष्ट्राची माफी मागावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक व्हावं हीच संभाजी ब्रिगेड ची मागणी आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading