जीवन सुखकर होण्यासाठी ते अधिक सुरक्षित असणे गरजे – खासदार गिरिष बापट

पुणे : लोकांमध्ये आग प्रतिबंध आणि सुरक्षेच्या दृष्टीने जनजागृतीच्या उद्धेशाने फायर अ‍ॅन्ड सेफटी असोशिएशन ऑफ इंडीया (FSAI)च्या वतीने पुण्यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भारतामध्ये 24 शहरांमध्ये फायर सेक्युरीटी यात्रा अंतर्गत विविध विषयांवर चर्चासत्र पार पडले. पुण्यातील कार्यक्रमाचे उद्घाटन ऑनलाईनद्वारे खासदार गिरिष बापट यांच्या हस्ते तर फिस्ट पुरस्कारांचे वितरण पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश व व्हीके ग्रुपचे अध्यक्ष विश्वास कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. यावेळी पीएमआरडीएचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे आणि पुणे मनपा मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे यांचा सन्मान करण्यात आला.

एफएसएआयचे पुणे अध्यक्ष नितीन जोशी, सचिव अर्चना गव्हाणे, संयोजक अजित यादव, सल्लागार महेश गव्हाणे, अमोल उंबरजे, पूजा गायकवाड, सिम्पल जैन, अनुजा करहू, रवी कुमेरिया, हबीब शेख उपस्थित होते.  वीरेंद्र बोराडे व त्रीलोक तिवारी यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी फिस्ट (FIST: FINEST INDIA SKILLS & TALENT) सर्वोत्कृष्ट भारतीय कौशल्य आणि प्रतिभा पुरस्कारामध्ये तीन विभागात हे पुरस्कार देण्यात आले. नाविन्यपूर्ण उत्पादन विभागामध्ये विघ्नहर्ता टेक्नॉलॉजी यांना तर निर्धोक आणि सुरक्षित विभागामध्ये कोलतेपाटील टाउनशिपला मिळाला. फ्रंटलाईन वॉरिअर विभागामध्ये एसके सौरिओ हिटलर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. याव्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या प्रकल्पाला पुरस्कार मिळाला.

माणसाचे जीवन सुखकर होण्यासाठी ते अधिक सुरक्षित असणे गरजे आहे. फायर सेफ्टी हा विषय औद्योगिक क्षेत्रापुरते न राहता त्याची व्याप्ती वाढली आहे. कोरोनाकाळात हॉस्पिटलमध्ये झालेल्या आगीच्या घटना महाराष्ट्र विसरु शकला नाही. त्यामुळे अग्नि प्रतिबंधक सुरक्षा विषयात अधिक संशोधन होण्याबरोबर शैक्षणीक उपक्रमांमध्ये याविषयाचा समावेश होणे गरजेचे आहे. त्याकरिता शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन खासदार गिरिष बापट यांनी केले.

पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले, वृद्ध, गर्भवती, लहान मुलांच्या सुखकर भविष्यासाठी निवासी किंवा औद्योगिक बांधकामावेळी अग्निप्रतिबंध आणि सुरक्षिततेचा आग्रह धरण्याची गरज आहे. निवासी आणि औद्योगिक क्षेत्रात आग प्रतिबंध उपाययोजना जनजागृती खुप गरजेची आहे. दुसरा कोणी येउन आपल्याला वाचवेल ही भावना बाजुला ठेवून प्रत्येक व्यक्तीने स्वत:च्या सुरक्षीततेबाबत जागृत रहावे. लोकांचे जीवन सुरक्षित करण्याच्या दृष्टीने ज्यांनी उत्कृष्ठ काम केलेत त्यांना पुरस्काराने सन्मानित करणे हा मी माझा सन्मान समजतो. असे प्रतिपादन आयुक्त कृष्णप्रकाश यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: