केतन जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त बिबवेवाडी मध्ये मोफत लसीकरण

पुणे: लसीकरण प्रत्येक नागरिकांनी कोरोना या महारोगा पासून दूर राहण्यासाठी प्रत्येक नागरिकांनि घेतली पाहिजे.लसीकरणा साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पासून ते नगरसेवक,खासदार ते सामाजिक कार्यकर्ते पुढे येवून लसीकरणा साठी पुढाकार घेत आहे. अश्यातच पर्वती युवक काँग्रेसने पुढाकार घेतला आहे.पर्वती युवक काँग्रेसने बिबवेवाडी येथील   इंदिरा नगर भागातील नागरिकांसाठी पुढाकार घेतला आहे.इंदिरा नगर भागातील लोअर विजय दळवी सांस्कृतिक भवन येथे मोफत लसीकरण आज पार पडले.पर्वती युवक काँग्रेसचे अध्यक्ष केतन जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत लसीकरणाचा कार्यक्रम पार पडला.

बिबवेवाडी आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी नागरिकांचे मोफत लसीकरण केले . या लसीकरणाचे आयोजन .पर्वती युवक काँग्रेसचे अध्यक्ष केतन जाधव यांनी केले.या कार्यक्रमाला प्रथमेश गुरव,सागर तळेकर,बिबवेवाडी मधील काँग्रेसचे पदाधिकारी,व कार्यकर्ते व पर्वती युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
केतन जाधव म्हणाले,काँग्रेसने पुण्यात लसीकरणा साठी पुढाकार घेतला आहे.पर्वती युवक काँग्रेसच्या वतीने आज आम्ही बिबवेवाडी भागात मोफत लसीकरणासाठी पुढाकार घेतला आहे. मोफ़त लसीकरणाला आज येथील नागरिकांनि भरपूर प्रतिसाद दिला आहे. पुणे शहर लवकर कोरोना मुक्त होउदे .असे आम्हाला वाटते.

Leave a Reply

%d bloggers like this: