डॉ. दिलीप गरुड व मुकुंद तेलीचरी यांना बालक मित्र पुरस्कार जाहीर

पुणे : डॉ. दिलीप गरुड व मुकुंद तेलीचरी यांना बालक संस्थेच्या वतीने देण्यात येणारा बालक मित्र पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्येष्ठ साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ डॉ. न.म. जोशी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. शनिवार, दिनांक ४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता, शुक्रवार पेठेतील राष्ट्रभाषा भवन येथे हा कार्यक्रम होणार आहे. अशी माहिती बालक संस्थेचे कार्याध्यक्ष शिरीष जोशी यांनी दिली

डॉ. दिलीप गरुड व मुकुंद तेलीचरी यांनी कथाकथनाच्या माध्यमातून हजारो मुलांच्या मनात राष्ट्रभक्तीची भावना रुजविली आहे. तीन दशके निष्ठावंत व प्रेरक शिक्षक म्हणून त्यांनी कार्य केले. त्यामुळे त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी त्यांना बालक मित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. रोख ५ हजार रुपये, मानपत्र महावस्त्र व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे

Leave a Reply

%d bloggers like this: