Monday, June 22, 2026
Latest NewsPUNE

‘मदर तेरेसा पुरस्कार-२०२१’ सिस्टर फिलोमीना थॉमस यांना प्रदान

पुणेः-  मदर तेरेसा यांनी निःस्वार्थपणे पीडितांची, शोषितांची, जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन मानवसेवा केली व त्यांचा आधार बनुन त्या ‘आई’ म्हणून उभ्या राहिल्या, तोच आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवला पाहिजे असे मत पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी व्यक्त केले.

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, सांस्कृतिक विभागातर्फे मदर तेरेसा यांच्या १११ व्या जयंतीनिमित्त यंदाचा ‘मदर तेरेसा पुरस्कार-२०२१’ सिस्टर फिलोमीना थॉमस यांना शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

 यावेळी कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षा लता राजगुरू, याप्रसंगी अमीर शेख, राहुल शिरसाट, दत्ता पोळ, अनिस खान, कुणाल राजगुरू, क्लेमेंट लाझरस, विनोद निनारीया, मुन्ना शेख व इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभागाचे प्रमुख विठ्ठल गायकवाड व माजी नगरसेवक राजेंद्र शिरसाट यांनी केले होते.

रमेश बागवे म्हणाले की, समाजात कोणतीही अपेक्षा न ठेवता काम करणारे सिस्टर फिलोमीना थॉमस यांच्या सारखे समाजसेवक हे मदर तेरेसा यांचेच समाजसेवेचे व्रत पुढे नेत आहेत. असा सकारात्मक समाजसेवकांमागे आपण सर्वशक्तिनिशी उभे राहिले पाहिजे.

कार्यक्रमाच्या सत्कारमूर्ती सिस्टर फिलोमीना थॉमस यांनी मदर तेरेसा यांचा आदर्श समोर ठेवीत त्यांना प्रदान करण्यात आलेला सन्मान हा त्यांच्या सहकाऱ्यांना समर्पित केला. तसेच पुरस्कारच्या उत्तरार्थ थोडक्यात मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाप्रसंगी पं. वसंतराव गाडगीळ, भन्ते सुदस्सन, ज्ञानी छिंदरपाल सिंग, मौलाना हाफिज एहतेशाम, फादर स्टॅनली यांनी विश्वशांतीचा संदेश दिला.

या कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षा नगरसेविका लता राजगुरू यांच्या हस्ते अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच पुणे शहर काँग्रेस ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष द. स. पोळेकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading