अफगाणीस्तानच्या लोकांच्या वेदना ऐकून केरळच्या राज्यपालांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

पुणे: अफगाणीस्तानच्या सत्तेचे काय होईल हा वेगळा प्रश्न आहे. मात्र तेथील जनतेच्या दुख:च्या आणि छळाच्या बातम्या ऐकून मी व्यथित झालो आहे. माझ्याकडे त्यांच्याबद्दल सांत्वना करण्यासाठी शब्द नाहीत असे उदगार केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी आज पुण्यात अफगाणीस्तानच्या विद्यार्थ्यांसमोर बोलताना काढले हे उदगार काढतानाच त्यांच्याही डोळ्यात अश्रू तरळले.

सरहद संस्थेच्या पुढाकाराने अफगाणीस्तान विद्यार्थी संघटनेचे वली रहमानी, इसाक गयुर, फरसाना अमिनी, मोहम्मद इम्रान, मोहंमद अहमदी यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी आरिफ मो. खान यांची भेट घेतली यावेळी सरहदचे संजय नहार, जाहिद भट, अर्हम फौंडेशनचे शैलेश पगारिया, चित्रपट निर्माते निलेश नवलाखा उपस्थित होते.

भारतातील लोक अफगाणिस्तान मधील परिस्थितीमुळे चिंतीत असून एक आई आपल्या लहान बाळाला वाचविण्यासाठी लष्कराच्या स्वाधीन करते या चित्राने मला पुरते हलवून टाकले. आई आपले सर्वोच्च प्रेम असलेल्या बाळाला त्याचे प्राण वाचावे यासाठी लष्कराच्या स्वाधीन करते अशा शेकडो घटनांनी जगभरातील संवेदनशील लोकही अस्वस्थ झाले.

 या परिस्थितीत सरहद संस्थेने गुरु तेग बहादूर तसेच माता गुजरी यांच्या नावाने १००० अफगाणी विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती देण्यासाठी जो पुढाकार घेतला आहे. यासाठी विविध पातळ्यांवर परवानगी मिळविण्यासाठी काय करता येईल हे मी स्वत:ही पाहील व योग्य त्या व्यासपीठावर माझे मत मांडून विनंती करेन मात्र इथे राहणाऱ्या अफगाणी विद्यार्थ्यांना मदत करणे हे राष्ट्रहिताचे आहे असे माझे ठाम मत आहे असेही त्यांनी या प्रसंगी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: