श्री देशमुख महाराज फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांचे संस्कार समाजासाठी आदर्श- खा. गिरीश बापट

पुणे : मला राजकारणात पन्नास वर्षे झाली असली तरी राजकारण अजून मला समजले नाही. ज्या दिवशी पुर्ण समजेल त्या दिवशी मी संपेल; असे प्रतिपादन करत खासदार गिरीश बापट यांनी सतत नव-नवीन शिकतात राहण्याच्या प्रवृत्तीला प्राधान्य देत आध्यात्मिक ज्ञान आणि संस्काराचे महत्त्व स्पष्ट केले. अपुर्णत्वाची भावना व्यक्तीला क्रियाशील बनवते. धर्म, अध्यात्म, समाजकारण, राजकारण या सर्वांनी हेच शिकवल की, माणूस जन्माला येतो तेव्हाही विद्यार्थी आणि मृत्यूच्या दिवशीही विद्यार्थीच असतो ही भावना घेऊन जो आयुष्य जगतो तोच खरा जीवन जगतो.

नक्षत्र- नऊवारी दालन आणि श्री देशमुख महाराज फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश कला क्रीडा व सणस ग्राउंड येथे कोविड रुग्ण आणि तेथील सर्व कर्मचारी वर्गांना अखंड चुल, कोव्हिड १९ प्रसाद अंतर्गत दोन वेळचे मोफत जेवण देण्याचे कार्य केले. अन्नदान व रुग्णसेवेच्या या पुण्य कार्याबद्दल पुणे महानगरपालिकेच्या वतीने सर्व स्वयंसेवकांना सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या वेळी खा. गिरीष बापट, डॉ. ऋतुपर्ण शिंदे, पु. गुरूदास देशमुख महाराज, उद्योजक गणेश तुम्मा (संचालक, नक्षत्र-नऊवारी), संजय बालगूडे (मा. नगरसेवक), डॉ. उज्वनकर गोपाळ, फाऊंडेशनचे सर्व स्वयंसेवक, नक्षत्रचे कर्मचारी, सन्मानार्थी आदी उपस्थीत होते.

खा. बापट म्हणाले, श्री देशमुख महाराज फाऊंडेशन व नक्षत्रचे काम मी अनेक वर्षांपासून पाहतोय. प्रत्येक सेवक हे समर्पण भावनेतून समाजाची सेवा करण्यासाठी तन-मन-धनाने सदैव तत्पर असतात. स्वामींचे आशिर्वाद आणि देशमुख महाराजांचे संस्कारातून असे व्यती घडत आहेत यांचा मला अभिमान वाटतो. पुणे मनपाच्या वतिने हा सत्कार त्याचा करण्यात आले त्याबद्दल ही बापट यांनी सर्वांचे अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

श्री. देशमुख महाराज म्हणाले, कुठल्याही प्रकारची सरकारी अथवा खाजगी मदत न घेता हे काम उभे राहिले यामध्ये सर्व स्वयंसेवकाचे मोठे योगदान आहे. प्रत्येकाने स्व इच्छेनुसार व होईल त्या प्रमाणात या प्रसाद रूपी सेवा कार्यात सहभाग दिला त्यामुळे हे कार्य शक्य झाले. या साठी सर्वांना आशिर्वाद आणि पुणे महानगरपालिके केलेल्या सन्माना बद्दल त्यांनी मनपाचे आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: