एचडीएफसी मल्टी अँसेट फंड एका फंडाच्या माध्यमातून तीन अँसेट क्लासेसमध्ये गुंतवणूक करण्याचे लाभ

पुणे  : सर्वोत्तम कामगिरी करणारे अँसेट क्लास नेहमी बदलत राहतात. त्यामुळे संपत्ती निर्मितीसाठी अँसेट अँलोकेशन महत्त्वाचे असते. ‘एचडीएफसी मल्टी- अँसेट फंडा’तर्फे गुंतवणुकदारांच्या अँसेट अँलोकेशन ’च्या गरजा पूर्ण करण्याकरीता इक्विटी, डेट व गोल्ड या ३ ‘अँसेट क्लासेस’मध्ये गुंतवणूक करण्यात येते. ‘इक्विटी’मधून भांडवल वाढविण्याचे उद्दिष्ट साध्य केले जाते, ‘डेट’मधून पोर्टफोलिओला स्थैर्य मिळते आणि सोन्यामध्ये सुरक्षिततेची क्षमता जास्त असते; ते महागाई व चलन घसरणीपासून संरक्षणदेखील देते.

या मॉडेलमध्ये ‘अनहेज्ड इक्विटी अँलोकेशन’ची टक्केवारी दर्शविण्यात येते आणि यासाठी ४ मूल्यांकनावर आधारित घटकांचा विचार करण्यात येतो. या मॉडेलद्वारे सूचित झालेल्या ‘अनहेज्ड इक्विटी  अँलोकेशन’ची व्याप्ती ४० टक्के ते ८० टक्के या दरम्यान आहे. मागील कालावधीच्या तुलनेत सध्या बाजारपेठ महाग असेल, तर हे मॉडेल ‘अनहेज्ड इक्विटी’चे अँलोकेशन कमी दर्शवेल, तसेच या उलटही घडू शकेल.

  या योजनेमध्ये एकूण अँसेट्स’च्या १० ते ३० टक्के इतकी गुंतवणूक ‘डेट इन्स्ट्रूमेंट्स’मध्ये केली जाते या योजनेमध्ये सध्या ‘लार्ज कॅप’ कंपन्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. सेक्टर अँलोकेशन’चा विचार केल्यास, या योजनेमध्ये ग्राहकांसाठीच्या अत्यावश्यक वस्तू, ग्राहकोपयोगी वस्तू आणि औद्योगिक उत्पादने या क्षेत्रांतील कंपन्यांना अधिक महत्त्व देण्यात आले आहे, तर अर्थ व ऊर्जा क्षेत्रांतील कंपन्यांमध्ये कमी अँलोकेशन आहे.इक्विटी, कर्ज व सोने हे तीन अँसेट क्लास एकाच योजनेत मिळविण्याचा आणि त्यात दीर्घकालीन गुंतवणूक करण्याचा विचार जे गुंतवणूकदार करतात, त्यांच्यासाठी ‘एचडीएफसी मल्टी- अँसेट फंड’ हा अत्यंत योग्य मार्ग आहे.

‘एचडीएफसी अँसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड’चे वरिष्ठ फंड व्यवस्थापक अमित गणात्रा म्हणाले की आर्थिक व वित्तीय धोरणे, मागणीतील मोठी वाढ, लसीकरण मोहीम आणि कॉर्पोरेट कंपन्यांना होऊ लागलेला नफा ही कारणे जागतिक तसेच देशांतर्गत वाढीच्या संधींना अनुकूल ठरू लागली आहेत. कोविडपश्चात काळात भारतातील कॉर्पोरेट क्षेत्राचे उत्पन्नाचे चक्र फिरू लागले आहे. या मजबूत उत्पन्नाच्या चक्रातून गुंतवणूकदारांना  इक्विटी’मध्ये ‘अँसेट क्लास’ म्हणून सहभागी होण्याची संधी निर्माण होत असते तथापि, कोविडची संभाव्य तिसरी लाट, सुधारणांमधील स्थिरता, संभाव्य उच्च महागाई आणि बाजार उंच पातळीवर गेल्यानंतरचे उच्च मूल्यांकन यांच्याबाबत अनिश्चितता आहे. अशा प्रकारच्या वातावरणात, गुंतवणूकदारांनी अँसेट अँलोकेशनच्या धोरणाचा विचार केला पाहिजे.

Leave a Reply

%d bloggers like this: