महाराष्ट्राचा अफगणिस्तान करणार आहात का…!

‘सत्तेची मस्ती अंगार है, बाकी सब भंगार है…’ अशी सध्याच्या राजकीय गोंधळात महाराष्ट्रात ही अवस्था झालेली आहे. सत्तेचा वेध घेण्यासाठी आणि एकमेकांची वाभाडे काढण्यासाठी बेताल वक्तव्याचा पाऊस महाराष्ट्रात पडत आहे. कोरोना महामारी चे भयानक संकट असताना सुद्धा राणे आणि ठाकरे यांच्या भांडणात शेकडो लोक आज रस्त्यावर उतरत गर्दी करत आहेत. जनसंवाद यात्रा बेकायदेशीररित्या चालवून गर्दी जमवण्यासाठी सरकार सुद्धा परवानगी देत आहे. मात्र यातून महाराष्ट्राचे प्रमुख प्रश्न, वाढती महागाई, बेरोजगारी, नैसर्गिक आपत्ती, अपुरे लसीकरण , जनतेची सध्याची हलाखीची परिस्थिती, आरोग्य आणि महामारी च्या समस्या…? या व अशा भयानक प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचा हा सगळा प्रकार आहे. आणि यांच्या राजकीय भांडणातून राज्यात ‘दंगल’ सदृश्य परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न चालू असून तशी पावलं उचलली जात आहेत.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा कोणत्याही राजकीय पक्षांनी, संघटनेने अथवा व्यक्तीने आदरयुक्त सन्मान राखलाच पाहिजे. मायबाप सरकार म्हणून आणि जनतेचे पालकत्व घटनात्मक रीतीने त्यांच्याकडे असतं. त्यांच्याच मुस्काटात मारण्याची भाषा ही असंसदीय आहे. अशा वक्तव्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. दिवस भर चाललेल्या गोंधळातूनमहाराष्ट्राचा अफगणिस्तान झालाय काय…! आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या रूपात तालिबानी घुसलेत का…? असाच प्रश्न सामान्य नागरिक म्हणून पडला आहे. गलिच्छ राजकारणात लोक अडचणीत आहेत ते विसरू नका. राजकीय भांडणं थांबवा.

मित्रांनो… महाराष्ट्रात सध्या भलतच घडतय. सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात विरोधी पक्षांचे नेते जनतेला वेठीस धरून काहीही भूमिका मांडत आहेत जे माणूस आणि त्याचं कुटुंब उध्वस्त करणारे आहे. यामुळे तुमचे प्रमुख प्रश्‍न, संकटं बाजूला ढकलून… महाराष्ट्रात दररोज वेगळाच ‘तमाशा’ आपल्यासमोर प्रसिद्ध होत आहे. ‘चिखलातून शेणात आणि शेणापासून चिखलात लोळण्याचा कार्यक्रम सुरू आहे.’ ही नुसता जनतेची दिशाभुल करण्याचा चिपाड कार्यक्रम…! सुरू आहे.

जोशी, देशपांडे, कुलकर्णी, फडणवीस यांची पोरं आज दगडं-काठ्या घेऊन रस्त्यावर आहेत का…! नाही.

आमची मराठा-बहुजनांची पोरं मात्र रस्त्यावर ‘आंदोलन’ करत आहेत. म्हणजे… लक्षात घ्या, ‘यांची मुलं स्टडीत आणि आमची कस्टडीत…’

कुठे नेऊन ठेवणार महाराष्ट्र माझा…!!

  • संतोष शिंदे,
    प्रदेश संघटक, संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र
    9850842703

Leave a Reply

%d bloggers like this: