Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

राजकीय नेतृत्वावर अंकुश ठेवण्याची जबाबदारी साहित्यिकांची- ज्येष्ठ इतिहास संशोधक भा.ल. ठाणगे

पुणेः- साहित्यिकांनी वेळोवेळी भूमिका घेत राजकीय नेतृत्व चुकत असेल, दिशाहीन होत असेल तर आपल्या शब्दांच्या फटका-यांनी अंकुश ठेवण्याची अंतिम जबाबदारी ही साहित्यिकांनी पार पाडली पाहिजे. आचार्य अत्रे यांनी त्यांच्या जाहीर भाषणांतून ही भुमिका वेळोवेळी घेतलेली दिसून येते. आपण त्यांचेच पाईक म्हणुवून घेत असून तर नवोदितांपासून प्रस्थापितांपर्यंत प्रत्येकांने ही भुमिका घेणे अपेक्षित असल्याचे मत ज्येष्ठ इतिहास संशोधक भा.ल.ठाणगे यांनी व्यक्त केले.

आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र साहित्य परिषद सासवड शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत 23 व्या आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलनाचे आज पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते उद्घघाटन झाले त्यावेळी संमेलनाध्यक्ष पदावरून ठाणगे बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते, महाराष्ट्र साहित्य परिषद सासवड शाखेचे अध्यक्ष अॅड. अण्णा खाडे,दळवी रुग्णालयाचे संचालक आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष डाॅ. राजेश दळवी, पुरंदर हवेलीचे माजी आमदार अशोक टेकवडे, पुरंदर पंचायत समितिच्या सभापती नलिनी लोळे, पुणे जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य माणिक झेंडेपाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

भा.ल.ठाणगे म्हणाले, सासडवडच्या मातीत अध्यत्मिक, शाैर्य आणि साहित्य सर्वच क्षेत्रात नाव कमवलेल व्यक्ति जन्मास आले, त्याअर्थी ही सासवडची भूमीत या तीन्ही मुल्यांचे गुणसूत्र आहेत, बीजे रोवली आहेत. ्यामुळे या मातीतून कसदार आणि अस्सलच जन्माला येईल याबद्दल खात्री आहे. ही भुमी उभ्या महाराष्ट्राचा उर्जा स्त्रोत आहे. आचार्य अत्रे यांनी त्यांच्या खुमासदार शैलीत सातत्याने राजकारण्यांच्या चुकीच्या धोरणावर आसूड ओढले.

आमदार संजय जगताप म्हणाले, साहित्याद्वारे व्यक्तिमत्वास पैलू पडतात. साहित्याचा अभ्यास,व्यसंग हा आपल्याला इतरांपैक्षा नेहमी उजवा ठरवतो .अत्रेंनी त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून सातत्याने सर्वसामान्यांचे संघर्ष मांडला सर्वसामान्यांचे जगणे मांडले. क-हेचे पाणी ही सासवडकर आणि पुरंदर वासीयांची ओळख झाली आहे. महाराष्ट्रात वावरत असतांना अत्रेच्या गावचा असल्याने लोक आदराने पाहतात.

सचिन घोलप यांनी संमेलनाच्या उद्घाटन सत्राचे सुत्रसंचलन केले तर महाराष्ट्र साहित्य परिषद सासवड शाखेचे अध्यक्ष अॅड.अण्णा खाडे यांनी आभार मानले.

दुपारच्या सत्रात ज्येष्ठ कवयत्री ज्योत्सना चांदगुडे यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रित कवींचे कवी संमेलन संपन्न झाले.  यावेळी कै. सोपान लांडगे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणा-या काव्य पुरस्काराचे देखील वितरण करण्यात आले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading