Monday, June 15, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALPUNETOP NEWS

डिसेंबरपर्यंत संपूर्ण लसीकरण ही राजकारण्यांची थापच – सायरस पूनावाला यांचा मोदींवर निशाणा    

पुणे : लसींचे कॉकटेल करणे चुकीचे आहे. १८ वर्षांखालील मुलांना कोविशिल्ड देणार नाही. ते धोकादायक आहे, असे स्पष्ट मत सायरस पूनावाला यांनी मांडले. तसेच राजकारणी डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण होण्याच्या थापा मारत आहेत, असे  रोकठोक उत्तर देत सायरास पूनावाला यांचा मोदींवर निशाणा साधला. दरम्यान, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिल्लीमध्ये घेतलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये प्रकाश जावडेकर यांनी मोदी सरकारच्या वतीने देशातील संपूर्ण लसीकरण डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, असा दावा केला होता.

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पारितोषिक यंदा ‘कोविशिल्ड’ ही करोनाची लस बनवणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष सायरस पूनावाला यांना प्रदान करण्यात आला आहे. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार पूनावाला यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पूनावाला बोलत होते.

पूनावाला म्हणाले, कोविशिल्ड ही जगातील सर्वात स्वस्त लस आहे. अतिशय माफक दरात आम्ही ही लस देत आहोत. पुण्यामधील रुग्णसंख्या तर मुंबईपेक्षाही जास्त असल्याचं चित्र मध्यंतरी निर्माण झालं होतं. याच पार्श्वभूमीवर पुण्यातीलच सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये तयार होणाऱ्या कोव्हिशिल्ड लसी आधी पुण्यात द्याव्यात अशी मागणी करण्यात आली. मात्र त्यावर काही ठोस निर्णय झाला नाही. तरी यासंदर्भातील एक मोठा खुलासा आता पूनावाला यांनी केला आहे. पुण्यामध्ये सर्वाधिक करोना रुग्ण असल्याचं अहवालामधून दिसून आल्यानंतर आम्ही पुण्याला सर्वाधिक लसींचा पुरवठा करण्याबद्दल विचारणार केली होती. मात्र केंद्रातील मोदी सरकारने त्यावर काहीच उत्तर दिलं नसल्याचं सायरस पूनावाला म्हणाले आहेत.

‘कोव्हिशिल्ड’ च्या निर्यातीला परवानगी मिळावी 

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने आतापर्यंत अनेक देशांना वेगवेगळ्या प्रकारच्या लसी निर्यात केल्या आहेत. ‘कोव्हिशिल्ड’ साठी सुमारे १५० देश लसींच्या प्रतीक्षेत आहेत. अडचणींच्या काळात आपण त्यांना मदत नाही करणार तर कधी करणार? बिलगेस्ट फाऊंडेशनने 5 हजार कोटी रुपये आगाऊ दिले आहेत. पण ‘कोव्हिशिल्ड’च्या निर्यात बंदीमुळे आम्ही त्यांना लस देऊ शकत नाही, असे म्हणत सारस पूनावाला यांनी मोदी सरकारने लसींच्या निर्यातीला परवनगी द्यायला हवी, अशी मागणीही केली आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading