Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कोरोना योद्ध्यांचा सन्मान

पुणे : कोरोनाच्या महामारीमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कोव्हिड योद्धांचा सन्मान ” अंब्रोशिया ग्रुपच्या वतीने नुकताच करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली. या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी डॉ. मिलिंद आचार्य, अभिनेत्री भार्गवी चिरमुले, नगरसेवक दिलीप वेडे पाटील, किरण दगडे पाटील आणि महुवा नारायण उपस्थित होते.

या प्रसंगी समाजातील फ्रंटलाईन वर्करांचा सन्मान करण्यात आला. यावेळी रुपल संचेती, डॉ.अपर्णा जोशी,अवंती गोवलीकर, बावधन सिटीजन फोरमचे दुष्यंत भाटिया, आरोग्य निरीक्षक वैभव घटकांबळे, मयुरी बनसोडे, प्रेरणा वाघेला, गोरख दगडे, डॉ. शंतनू देशपांडे, शलाका मुंदडा, राजू भालचिम, अंकुश मिसाळ, भीमराज गायकवड आदींचा सन्मान करण्यात आला.

सगळे जग थांबलेले असताना कुटुंबाची व स्वतःची कुठलीही काळजी न करता समाजासाठी झटणाऱ्या या योद्ध्यांचा आपल्या वतीने सन्मान करावा असे मनापासून वाटत होते आणि आज तो योग आला. यानिमित्ताने समाजातील सर्व घटकांच्या वतीने केलेला हा सन्मान नक्कीच समाधान देणारा आहे असे महुवा नारायण म्हणाल्या.

या प्रसंगी बोलताना अभिनेत्री भार्गवी चिरमुले म्हणाल्या की कोरोनाच्या काळात फ्रंटलाईन वर्करांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. मात्र ज्यावेळी केलेल्या कामाची दखल घेतली जाते. त्यावेळी अजून काम करण्यासाठी हत्तीचं बळ येतं. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महुवा नारायण यांनी केले तर सूत्रसंचालन ऋतूजा चौबे यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading