‘तू स्वत:ला सभ्य सनातन महिला म्हणते, तर हे सगळं काय आहे’, ब्रालेटमधील फोटोमुळे कंगना झाली ट्रोल
बॉलिवूडची ‘पंगा गर्ल’ अभिनेत्री कंगना रनौत नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. मात्र, आता कंगना तिच्या ब्रालेट परिधान केलेल्या फोटोमुळे ट्रोल झाली आहे. कंगनाने हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर इतरांना कंपड्यांवरून ‘डोस’ देणारी कंगना स्वतःच ब्रालेटमुळे ट्रोल झाली आहे.

अभिनेत्री कंगना रनौतने नुकतेच आपल्या ‘धाकड’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. त्या निमित्ताने कंगनाने संपूर्ण टीमला एक पार्टी दिली होती. या पार्टीमध्ये तिने पांढऱ्या रंगाचे ब्रालेट आणि पांढऱ्या रंगाची पँट परिधान केली होती. तर गळ्यात गोल्डन चेन परिधान केली होती. यावेळी केलेले हे फोटोशूट आहे. कंगनाचे हे बोल्ड अंदाजातील फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. नेटकरी म्हणाले, ‘तू एवढा घाणेरडा ड्रेस परिधान करशील अशी अपेक्षा नव्हती कंगना.’ , ‘तू स्वतः इतरांच्या पोस्टवर कमेंट करते, असा फोटो शेअर करताना तू विचार केला नाहीस का?’, ‘तू स्वत: ला सभ्य सनातन महिला म्हणते, तर हे सगळं काय आहे. दोन चेहरे कोणासाठी?’, ‘तू बॉलिवूडला आणि रिहानाला कपड्यावरून ज्ञान देते. आता काय झालं. भाजपाने तुला बाहेर काढलं का?’, “तू स्वतःची तुलना राणी लक्ष्मीबाई शी करते, आग तू कुठे आणि त्या कुठे’, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी कंगनाला ट्रोल केले आहे.
दरम्यान, आगामी काळात कंगना दिवंगत अभिनेत्री आणि तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या भूमिकेत ‘थलायवी’ या चित्रपटात दिसणार आहे. तसेच ‘तेजस’ आणि ‘धाकड’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
