fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

अण्णा भाऊ साठे यांचे संपूर्ण साहित्य पाठ्यपुस्तकात शिकवले गेले पाहिजे – संभाजी ब्रिगेड

पुणे : अण्णा भाऊंच्या साहित्यात जगात किंमत आहे. शिवशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य पाठ्यपुस्तकात शिकवले गेले पाहिजे. अण्णाभाऊ चे साहित्याला जगभर किंमत आहे. मात्र आपल्या देशात, महाराष्ट्रात अण्णाभाऊंचे साहित्य उपेक्षित ठेवलं गेलं. संयुक्त महाराष्ट्राच्या क्रांतिकारी चळवळीत अण्णाभाऊ साठे यांचे फार मोठे योगदान आहे.

आयुष्यात दिड दिवसच शाळेत जाऊन… 13 लोकनाट्य, 3 नाटके, 14 कथासंग्रह, 35 कादंबऱ्या, 1 शाहीरी पुस्तक,15 पोवाड़े, 1 प्रवास वर्णन, 7 चित्रपठ कथा. अनेक कथासंग्रह, जवळपास शेकडो पोवाडे, लावण्या, माझा रशीयाचा प्रवास हे प्रवास वर्णन असे विविध व विपूल साहित्य महाराष्ट्राला दिले. परंतु त्यांच्या साहित्याची महाराष्ट्राला किंमत नाही. अण्णा भाऊंच्या साहित्यात सामान्यांची तळमळ आहे. म्हणून, राज्य सरकारने पाठ्यपुस्तकात शिवशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सर्व साहित्याचा समावेश करावा. अशी मागणी अण्णाभाऊ साठे यांच्या 101 व्या जयंतीच्या निमित्ताने संभाजी ब्रिगेडच्या वतीने संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे यांच्या वतीने आज करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज सातासमुद्रापार पोवाड्याच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे यांनी जगभर पोहोचवले. ‘रशियाच्या…’ चौकाचौकात छत्रपती शिवाजी महाराजांची किर्ती पोवाडयातुन पोहचवणारे कष्टकरी, श्रमवादी, भटके विमुक्तांना आपल्या साहित्यात स्थान देऊन मराठी साहित्यात अजरामर झालेले…. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे… ह्या लढ्यात अतुलनीय व अजरामर योगदान अण्णाभाऊंचे आहे…. त्यांना ‘भारतरत्न पुरस्कार’ मिळाला पाहिजे… अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी केली.

बिबवेवाडी येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे, पुणे महानगर अध्यक्ष अविनाश मोहिते, उपाध्यक्ष महादेव मातेरे, विकास कांबळे, दादा कांबळे, अजय माने, नितीन वाघीरे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading