लोकजनशक्ती पक्षातर्फे अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन
पुणे : लोकजनशक्ती पक्षातर्फे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना १०१ व्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.पक्षाच्या पुणे शहर जिल्हा शाखेच्या वतीने अध्यक्ष संजय आल्हाट यांच्याहस्ते सारसबाग चौकातील अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला .
या वेळी अंकल सोनावणे ,के. सी. पवार,एड.अमित दरेकर, संजय चव्हाण, संजय भोसले, तय्यब शेख, बंडू वाघमारे आदी उपस्थित होते.
‘ महापुरुषांच्या कार्याचे उत्सव होत राहिल्यानेच गाव कुसाबाहेर राहणाऱ्या समाजापर्यंत विचार पोहोचले .दोन पिढ्या या विचारांनी प्रेरित होऊन प्रगतीची वाट चालू लागल्या.सुशिक्षितांचे प्रमाण अण्णाभाऊ साठे यांच्या सारख्या महापुरुषांच्या विचारांच्या प्रबोधनामुळे वाढले. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे तरुणांनी मंथन करावे आणि त्यांनी दाखविलेल्या मार्गाने देशसेवा करावी,’असे प्रतिपादन संजय आल्हाट यांनी केले .
