Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

राज्य प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर फडणवीसांनी अविश्वास दाखवू नये – काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी

पुणे : विविध पक्षीय ‘नेत्यांच्या दौऱ्यांमुळे’ मदत व पुनर्वसन कार्यात ‘व्यत्यय येतो’, प्रशासकीय यंत्रणेवर ताण येतो, त्यामुळे शक्यतो ‘जास्तीचे दौरे’ टाळावेत व अपेक्षीत मदत कार्याची माहीती संबंधित मंत्रालय वा प्रशासन प्रमुखांकडून घ्यावी अशी ‘स्तुत्य सुचना’ जेष्ठनेते मा शरदरावजी पवार साहेब यांनी आज केलीहोती .. त्यावर तातडीने माजी मुखयमंत्री व भाजपनेते देवेंद्र फडणवीस यांनी “नेत्यांच्या दौऱ्यांमुळेच् ‘शासकीय यंत्रणा’ जाग्या होतात”, असे संबोधून ‘राज्य प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच’ एकप्रकारे अविश्वास दाखवला आहे, हे राज्याचे प्रमुख राहीलेल्या व्यक्तीकडून अपेक्षीत नाही. आपल्या सत्ता काळांत जेंव्हा (आम्ही) विरोधी पक्ष नेत्यांनी दौरे केले तेंव्हाच प्रशासन हलले काय..(?) हाच अनूभव आपल्या ठायी होता काय(?) असा सवाल काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला आहे.

गोपाळदादा तिवारी यांनी म्हटले आहे की, विशेष करून ज्या ‘राज्य-प्रशासनाने’ फडणवीसांना देखील साथ दिली होती.. याचे भान तरी किमान फडणवीसांनी ठेवले पाहीजे होते..!
एकीकडे, फडणवीसांचे काळात “दोन दिवस पाण्यात असलेल्या पुरग्रस्तांनाच” मदत देण्याचे निष्कर्ष व धोरण राबवणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री महेदयांना मात्र आता महाविकास आघाडीने “कोणतेही निष्कर्ष न लावता” पुरग्रस्तांना तातडीने मदत करावी, असा सल्ला देणे मात्र सुचते आहे… तसेच त्यांचे काळातील पश्चिम महाराष्ट्रातील पुरग्रस्तांसाठी केंद्रा कडून ६,२०० कोटींचे अर्थ सहाय्य मागवून केंद्राच्या मदतीकडे डोळे लावून बसलेले मा फडणवीसांचे सरकार देखील जनतेला अद्याप आठवत आहे, असे वक्तव्य गोपाळदादा तिवारी यांनी मा फडणवीसांना संबोधून प्रकाशीत केलेल्या निवेदनात केले आहे…..
महाराष्टाची परंपरा, जनतेप्रती कर्तव्य व संस्कृतीचे संकेत राज्यातील प्रशासन चोख पाळत असल्याचा खरेतर सर्व पक्षीयांनाच अभिमान हवा..! असे ही गोपाळदादा तिवारी यांनी आपल्या प्रसिध्दी पत्रकात म्हंटले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading