Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNE

कर्तव्य फाउंडेशनतर्फे कॅम्पमध्ये वृक्षारोपण संपन्न

पुणे : कर्तव्य फाउंडेशनच्या ४ थ्या वर्धापनदिनानिमित्त स्व.चंद्रभागा लक्ष्मणराव भिकुले यांच्या स्मरणार्थ कॅम्प भागातील स्टेवली रोड येथे देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळेस प.महाराष्ट्र रेल्वेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहन दुधाणे, डाॅ.बंटी धर्मा, रवी पवार, अरविंद खंडेलवाल, फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भांबुरे,कार्याध्यक्ष अशोक देशमुख, दिलीप भिकुले,मोहसीन शेख, इम्रान कुरेशी, आकाश ढसाळ,उमेश गायकवाड, उद्यान विभागाचे विलास लोणारी, बाळू खैरे, आकाश आल्हाट आदी उपस्थित होते.

पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण करून त्याचे जतन व संवर्धन करणे ही काळाची गरज आहे असे मत यावेळेस प.महाराष्ट्र रेल्वेचे मोहन दुधाणे यांनी व्यक्त केले व कर्तव्य फाउंडेशनला वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या व फाउंडेशनच्या ई-अहवालाचे प्रकाशन केले,फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भांबुरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading