गुरू रंधावाची आता अभिनेता म्हणून बॉलिवूड एन्ट्री
प्रसिद्ध गायक आणि कंपोजर गुरू रंधावा याची गाणी जगभरात ऐकली जातात. त्याच्या बॉलिवूडमधील अनेक गाण्यांनी रसिकांच्या मनात वेगळे स्थान मिळविली आहे. आता मात्र, गुरू रंधावा अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यासाठी तयार झाला आहे. त्यामुळे केवळ म्युझिक व्हिडीओमध्ये दिसणारा गुरू आता सिनेमात अभिनय करताना दिसणार आहे. एका युवा संगीतकारावर आधारित चित्रपटात गुरू मुख्य भूमिका साकारत आहे. गरिबीतून संघर्ष करीत मोठ्या झालेल्या संगीतकाराची ही संघर्ष कथा आहे. या चित्रपटाची गाणी आणि कथा हे याचे बलस्थान आहे. लवकरच याचे चित्रीकरण सुरु होणार आहे. या चित्रपटाचे शीर्षक अद्याप निश्चित झालेले नाही. तसेच इतर स्टारकास्ट कोण असणार आहे याबाबत विचार सुरू आहे.
