महापालिका व बार असोसिएशनतर्फे न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे लसीकरण

पुणे : महापालिका  व पुणे ॲडव्होकेटस् बार असोशिएशन यांच्या सौजन्याने वकीलांचे व न्यायालयातील कर्मचारी वर्गाचे कोरोना प्रतिबंधित लसीकरण बिबवेवाडी येथील चिंतामणी नगरच्या सोसायटीच्या ऑफिस मध्ये करण्यात आले. त्यामध्ये तब्बल ४५० वकीलांना ६ जुन व १९ जुन २०२१ या दोन सत्रात कोव्हिशिल्ड या लसीचा पहिला तर काहींना दुसरा डोस देण्यात आला.

सदर लसीकरण कार्यक्रम घेण्यासाठी स्थानिक येथील नगरसेवक बाळा ओसवाल सामाजिक कार्यकर्ते विजय पवार व सुभेदा पवार यांनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे उद्धागटन पुणे प्रिंसिपल ॲडव्होकेटस् बार ॲड. सुदाम साने,ॲड किरण पवार, ॲड राजेश पुणेकर,ॲड सुनील कडुसकर,तसेच  व PCABA 2021 चे अध्यक्ष ॲड. गोरखनाथ झोळ व वरिष्ठ वैद्यकिय अधिकारी डॅा. तृप्ती सागळे यांच्या हस्ते झाले.

त्यावेळी पुणे ॲडव्होकेटस् बार असोशिएशन चे माजी अध्यक्ष ॲड मदनलाल छाजेड, ॲड संजय दातीर पाटील,ॲड विलास कुटे,ॲड सतीश गोरडे,ॲड सुशील मंचरकर,ॲड सुहास पडवळ, ॲड दिनकर बारणे तसेच महाराष्ट्र आणि गोवा शिस्तपालन समिती सदस्य ॲड अतिश लांडगे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन उपाध्यक्ष ॲड पांडुरंग शिनगारे, ॲड महेश टेमगिरे, ॲड मोनिका गाढवे, ॲड अनिल शिंदे, ॲड हरिष भोसुरे, ॲड धंनजय कोकणे, ॲड ऋतुराज आल्हाट,ॲड मंगेश नढे,ॲड दिनेश भोईर,ॲड प्राची शितोळे,ॲड कृष्णा वाघमारे,ॲड अमित गायकवाड यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: