Friday, October 23, 2026
Latest NewsPUNE

मनसेच्या वतीने नदीपात्राची स्वच्छता

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कसबा विभागाच्या वतीने राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने नदीपात्राची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. भिडे पुला खाली मोठा कचरा साचला होता त्याचा पाण्याच्या प्रवाहास अडथळा तसेच जलप्रदूषण होवू शकते त्याकरिता मनसेने येथे साफ साफई केली.

याप्रसंगी शहर सचिव रवि सहाणे, मनविसे प्रदेश कार्यकारणी सदस्य सारंग सराफ , शहर संघटक नीलेश हांडे ,कसबा सचिव वसंत खुटवड उपस्थित होते.
रवी सहाणे म्हणाले की, नदीपात्रातील कचऱ्याच्या घाणेरड्या वासामुळे तेथील नागरिकांना त्रास होत आहे त्यांनी आमच्या ऑफिस मध्ये दोन-तीन वेळा तक्रार केली होती
नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन आम्ही राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही स्वच्छता मोहीम करण्याचे ठरवले आम्ही नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन आख्या पुणे शहरात नागरिकांना मदत करत असतो.

सारंग सराफ म्हणाले की, नदीपात्रातील कचऱ्याचा लोकांना घाणेरडा वास येतो राज ठाकरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ही मोहीम करण्याचे ठरविले. पुणे शहर स्वच्छ कसे राहील आम्ही पुणेकरांसाठी प्रत्येक प्रभागात महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रत्येक नागरिकाला वर्षाचे बारा महिने कधीही मदत लागली तरी आम्ही 24 तास नागरिकांना मदत करू.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading