लीलावती आणि चॉईस कॉलेज मध्ये ‘बिझनेस योग’ चे धडे

पुणे : आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून लीलावती कॉलेज(सिंहगड रस्ता ) ,चॉईस कॉलेज(वारजे ) याठिकाणी ‘बिझनेस योग ‘ चे धडे देण्यात आले. ‘बडा बिजनेस ‘ चे संस्थापक डॉ विवेक बिंद्रा यांच्या सहकार्याने इस्कॉन प्रतिनिधींनी योग आणि भगवदगीता संदेशांचे धडे दिले.कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटीचे संस्थापक राकेश मित्तल यांनी संयोजन केले.

‘योगाच्या आचरणामुळे सर्वांना आरोग्य जपणे शक्य होते.भावी उद्योजकांनी तंदुरुस्त राहण्यासाठी योग आणि भगवद्गीतेच्या संदेशांची सांगड घालून मार्गक्रमण करावे. योग ही केवळ एक दिवस आचरणात आणण्याची गोष्ट नाही ,तर ती जीवनशैली बनली पाहिजे’,असे राकेश मित्तल यांनी सांगितले. यशस्वी व्यवसायिक होणे आणि यशस्वी उद्योगसाधना करणे ,यासाठी सातत्याने योगविषयक प्रात्यक्षिके आयोजित केली जातील ,असे त्यांनी सांगितले .

Leave a Reply

%d bloggers like this: