Thursday, September 3, 2026
Latest NewsPUNE

आझम कॅम्पस मध्ये ‘योग दिवस’ साजरा

पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटी (आझम कॅम्पस ) मध्ये २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त योग प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली . योग ही उत्कृष्ठ आणि उपयुक्त भारतीय परंपरा असून या परंपरेचे सर्वांनी दूत व्हावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी ए इनामदार यांनी यावेळी बोलताना केले .

संस्थेच्या मैदानामध्ये सकाळी सव्वा आठ वाजता योग प्रात्यक्षिके झाली . यात शिक्षक, प्राध्यापक, कर्मचारी वर्ग सहभागी झाला.विद्यार्थ्यांना ऑनलाईन सहभागी करुन घेतले गेले. स्पोर्ट्स अकॅडमीचे संचालक गुलजार शेख, माजिद सय्यद , शबनम पीरजादे यांनी संयोजन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading