Wednesday, October 21, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

ओबीसींचा आक्रोश मोर्चा मराठा समाजा विरोधात नाही – छगन भुजबळ

नाशिक – मराठा आरक्षणासाठी भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात राज्यभरात मराठा समाज मूक आंदोलन करत आहे. आज नाशिक येथे मूक आंदोलन होत आहे. मराठा समाजाला विरोध करण्यासाठी ओबीसींचा आक्रोश मोर्चा नाही, असे स्पष्टीकरण अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या मूक आंदोलनाला उपस्थिती लावत दिले आहे..

“काहींचं म्हणणं आहे की ओबीसींचे जे आक्रोश मोर्चे सुरु झाले आहेत, ते मराठा समाजाच्या विरोधात आहेत, असं नाही. दोन्ही समाज अडचणीत आहेत. मराठा समाजाचं आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने नाकारलं आणि ओबीसींचं असलेलं आरक्षणावर गदा आणली. सर्वोच्च न्यायालयाने माहिती गोळा करण्यास सांगितली, पण कोरोनाच्या काळात कोण माहिती गोळा करणार? कायद्याच्या कचाट्यात सापडल्यानंतर अडचणी निर्माण होता. त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की आमचं आरक्षण वाचवा. म्हणून त्यांचा आक्रोश मोर्चा आहे. पण काही जे लोक आहेत, ते मराठा आणि ओबीसी समाज यांच्यात वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, ते योग्य नाही,” असं छगन भुजबळ म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading