fbpx
Monday, May 13, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNE

महा एनजीओ फेडरेशनतर्फे राज्यस्तरीय ‘योगयज्ञात’ १०० ठिकाणी योग शिबीर

पुणे : विविध प्रकारची योगासने, सूर्यनमस्कार, प्राणायाम यांचे सादरीकरण करीत मन:शांतीची अनुभूती घेत गडचिरोली, कराड, जालना, जळगाव, नाशिक, परभणी, सांगली, मिरज, कोल्हापूर आदी शहरांमधून एकाच वेळी १०० ठिकाणी योग शिबीरे उत्साहात पार पडली. जागतिक योग दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीत योगयज्ञात १०० हून अधिक सामाजिक संस्था, कार्यकर्ते व नागरिकांनी सहभाग घेतला.

महा एनजीओ फेडरेशन, महाराष्ट्र तर्फे जागतिक योग दिनानिमित्त राज्यस्तरीय योगयज्ञाचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी व एकाच वेळी ही योग शिबीरे पार पडली. महा एनजीओ फेडरेशनच्या १०० सदस्य संस्थांनी राज्यभरात एकाच वेळी ही योग शिबीरे घेतली आहेत. योग शिबिरे श्री श्री रविशंकर यांच्या बेंगलोर येथील तज्ञ योग प्रशिक्षिका रुची सूद यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. तर, आर्ट आॅफ लिविंग या संस्थेचे अंकित बत्रा यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. पुणे येथील महा एनजीओ फेडरेशनच्या कार्यालयातून आॅनलाइन लिंक द्वारा हे शिबीर घेण्यात आले.

भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष श्याम जाजू , महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बाळा नांदगावकर यांनी योगाचे महत्व सांगत संस्थेच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा, मुख्य कार्यवाहक विजय वरुडकर, उपक्रम प्रमुख गणेश बाकले, मुकुंद शिंदे, अक्षयमहाराज भोसले, अमोल उंबरजे, राहुल पाटील यांनी उपक्रमाचे आयोजन केले. सहभागी व्यक्तींना प्रमाणपत्र देखील देण्यात आले. महा एनजीओ फेडरेशन ही महाराष्ट्रातील २००० संस्थांचे संघटन करणारी संस्था असून योग दिनाच्या निमित्ताने सर्व संस्थांमध्ये योग करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

शेखर मुंदडा म्हणाले, कोरोना पासून बचाव तथा कोरोनामुक्ती साठी उपाय म्हणून योग हे उत्तम माधम आहे. कोरोना हा आजार मनुष्याच्या फुप्फुसांवर आघात करतो. योगा व प्राणायामाने फुप्फुसांची कार्यक्षमता वाढते तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे योगदिनानिमित्त राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी प्रोजेक्टर वर दाखवून २५ ते ५० व्यक्तींच्या सहभागाने योगासने, ध्यान, प्राणायाम व देशभक्तीपर गीतांचे श्रवण करण्यात आले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading