हेलन केलर पुरस्कार नामदेव आल्हाट यांना जाहीर


पुणे :- रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे हेलन केलर यांच्या स्मरणार्थ “हेलन केलर पुरस्कार ” प्रतिवर्षी  प्रतिभावान नेत्रहीन व्यक्तिस दिला जातो. यंदाच्या वर्षी “हेलन केलर पुरस्काराने ” महाराष्ट्र राज्याच्या दीव्यांग संघाचे अध्यक्ष ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नामदेवराव उर्फ दादा आल्हाट यांना जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती रंगत-संगत प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर  यांनी कळवली आहे. 

रविवार दिनांक 27 जून रोजी सकाळी 10.30 वाजता ज्येष्ठ व्याख्यात्या प्रतिभाताई शाहू मोडक यांच्या हस्ते पुरस्कार वितरीत करण्यात येणार आहे. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यअध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आणि शेतकरी कामगार पक्षाचे शहर अध्यक्ष सागर आल्हाट हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थितीत राहणार आहेत. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असून छोटेखानी घरगुती समारंभात हा पुरस्कार वितरण समारंभ होणार असल्याचे रंगत-संगत प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळवली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: