आयसायसीआय बँकेतर्फे ऑनलाइन खरेदीसाठी ‘कार्डलेस ईएमआय’
मुंबई : आयसीआयसीआय बँकेने ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवरील ऑनलाइन खरेदीसाठी ‘कार्डलेस ईएमआय’ ही इन्स्टंट सुविधा लाँच केली आहे. या सुविधेमुळे पूर्व- मंजुरी असलेल्या बँकेच्या लाखो ग्राहकांना अधिक वाजवीपणा मिळेल, शिवाय इक्वेटेड मंथली इन्स्टॉलमेंट्समध्ये (ईएमआय) ऑनलाइन पातळीवर तत्काळ एखादे उत्पादन आणि सेवा खरेदी करता येईल. महत्त्वाचे म्हणजे मोबाइल फोन व पॅन वापरून केवळ काही क्लिक्सच्या मदतीने खरेदी करता येणार आहे. ग्राहकांना ई- कॉमर्स संकेतस्थळ किंवा अपवरील चेक आउट विभागात नोंदणीकृत मोबाइल क्रमांक, पॅन आणि ओटीपी (मोबाइल क्रमांकावर मिळालेला) वापरून 5 लाख रुपयांपर्यंतच्या व्यवहारांचे सुलभ मासिक हप्त्यांमध्ये रुपांतर करता येणार आहे. ही सुविधा विविध प्रकारच्या उत्पादन श्रेणींसाठी वापरता येणार आहे.
ऑनलाइन खरेदीसाठी सोयीस्कर, तत्काळ, कार्डलेस ईएमआय सुविधा पुरवणारी आयसीआयसाय बँक ही या क्षेत्रातील पहिली बँक असून सात महिन्यांपूर्वी हीच सेवा रिटेल दालनांसाठी लाँच करण्यात आली होती. बँकेने ही सुविधा 2500 ब्रँड्सवर उपलब्ध करण्यासाठी फ्लेक्समनी आणि शॉपसे या आघाडीच्या डिजिटल कर्ज देणाऱ्या प्लॅटफॉर्म्सशी करार केला आहे.
या नव्या सुविधेविषयी आयसीआयसीआय बँकेच्या अनसिक्युअर्ड असेट्स विभागाचे प्रमुख श्री. सुदिप्ता रॉय म्हणाले, ‘आयसीआयसीआय बँकेमध्ये आम्ही कायमच ग्राहकांना नाविन्यपूर्ण, सोयीस्कर, सुलभ उत्पादने देण्यावर भर दिला आहे. या विचारांनीच आम्ही सणासुदीच्या काळात रिटेल दालनांसाठी इन्स्टंट ‘कार्डलेस ईएमआय’ सुविधा लाँच केली. या सुविधेमुळे ग्राहकांना त्यांच्या आवडीचे उत्पादन पूर्णपणे संपर्कविरहीत, सुरक्षित व डिजिटल पद्धतीने खरेदी करणे शक्य झाले. या सुविधेला मिळालेल्या प्रोत्सहनात्मक प्रतिसादामुळे आम्ही सुविधा आता ऑनलाइन खरेदीसाठीही उपलब्ध केली आहे. यामुळे आमच्या ग्राहकांना आता 2500 ई- कॉमर्स व्यापारी व ब्रँड्सकडे केवळ मोबाइल फोन आणि पॅन वापरून खरेदी करता येणार आहे. या नव्या ऑफरमुळे ग्राहकांना अतिरिक्त वाजवीपणा मिळणार आहे, कारण त्यांना उच्च मूल्य असलेली उत्पादने सुरक्षित, तत्काळ, सोयीस्कर व डिजिटल पद्धतीने तत्काळ खरेदी करता येणार आहेत.”
फ्लेक्समनी टेक्नोलॉजीजचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी येझ्दी लश्कारी म्हणाले, ‘आयसीआयसीआय बँकेबरोबर भागिदारी करून त्यांच्या ग्राहकांना आपल्या आवडीच्या ई- कॉर्मस मर्चंट व ब्रँड्सकडे ‘कार्डलेस ईएमआय’च्या मदतीने खरेदी करण्याची सुविधा पुरवताना अतिशय आनंद होत आहे. खरेदीसाठीच्या वित्त सुविधांचे भविष्य ग्राहकांना सफाईदार, एकत्रित, कार्डलेस, डिजिटल क्रेडिट चेकआउट अनुभव देणारे असेल
शॉपसेचे सह- संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लव जैन म्हणाले, ‘आम्ही आमचे मर्चंट भागीदार व ग्राहकांना सर्वोत्तम ईएमआय सुविधा देण्यासाठी आग्रही असतो. त्याचमुळे आयसीआयसीआय बँकेबरोबर त्यांच्या अशाप्रकारच्या पहिल्या, नाविन्यपूर्ण कार्डलेस, ईएमआय उत्पादनासाठी भागिदारी करण्याची संधी मिळाल्याचा आम्हाला अभिमान वाटतो.
