कैलाश खेर यांनी गायले ‘या’ मराठी मालिकेचे शीर्षकगीत

कलियुगात जेव्हा मनुष्यावर असुरी शक्ती वरचढ होऊ लागली, तेव्हा मनुष्यकल्याणासाठी नवनारायणांनी नवनाथांच्या रूपात अवतार घेतला.  टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच सोनी मराठी वाहिनी नवनाथांवर मालिका घेऊन येत आहे. ‘गाथा नवनाथांची’ ही मालिका २१ जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या मालिकेचे शीर्षकगीत गुरू ठाकूर यांनी लिहिले असून पंकज पडघण यांनी संगीतबद्ध केले आहे. प्रख्यात गायक कैलाश खेर यांच्या आवाजात हे शीर्षकगीत लोकांना ऐकायला मिळणार आहे. नवनथांचा महिमा आणि त्यांची ख्याती या मालिकेबरोबरच या शीर्षकगीतामुळे सुद्धा लोकांपर्यंत पोचणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: