Friday, May 29, 2026
ENTERTAINMENTLatest NewsTECHNOLOGY

‘स्टोरीटेल मराठी’वर आस्ताद काळेच्या आवाजात ‘चेकमेट’चा रहस्यमय थरार

जून महिन्यात स्टोरीटेल मराठीवर प्रसिद्ध होणाऱ्या “चेकमेट” या कमाल ऑडिओबुक्स मालिकेतील थरारक अनुभव रसिकांना त्यांच्या आवडत्या ऑडिओबुक्स प्रकारात ऐकता येणार आहेत. अभिनेता आस्ताद काळे त्याच्या भारदस्त आवाजात हा थरारक स्टोरीटेलवर अनुभवा येणार आहे. लेखक श्रीपाद जोशी आणि जयेश मिस्त्री यांनी ही नवी ऑडिओबुक मालिका लिहिली आहे.

कविताला पैशांसाठी निनावी कॉल्स येत आहेत. “पैसे नाही दिले तर तुझा आणि तुझ्या फॅमिलीचा गेम खल्लास…” तिचं राजेश नावाच्या एका माणसासोबत दुसरं लग्न ठरलंय… राजेशच्या हस्ते फोन करणाऱ्याला पैसे देऊनही धमकीच्या कॉल्सचं सत्र सुरुच आहे. पण मग कविताचा असा कोण शत्रू आहे?  त्याला नक्की पैसेच हवेत की अजून काही? आता ही केस आलीय इन्स्पेक्टर अभिमन्यू प्रधानकडे… अभिमन्यू त्या शातीर गुन्हेगराला पकडू शकेल का? तुम्हाला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी स्पेन्सफुल क्राईम ‘स्टोरी ‘चेकमेट’ एकदा ऐकलीच पाहिजे.

या अनुभवा विषयी बोलताना अभिनेते आस्ताद काळे सांगतात “‘स्टोरीटेल मराठी’साठी ‘चेकमेट’ वाचताना खूप मजा आली. ‘चेकमेट’ वाचण्यापूर्वीच मी मर्डर मिस्ट्रीचे ‘स्टोरीटेल मराठी’साठी वाचन केले होते. ‘चेकमेट’ ही मालिका तशी लहान आहे पण थरार आणि उत्कंठा ताणून धरणारी आहे. ‘ऑडिओबुक’ या माध्यमासाठी वाचन करताना मला कायम चॅलेंजिंग वाटतं. यात वेगवेगळी कॅरेक्टर्स करायला मिळतात. हे श्रवणाचे माध्यम असल्याने त्यात दृश्य, प्रसंग, जागा, देहबोली हे सगळंच उभं करायचं असतं फक्त आवाजातून. आणि ते फार मजेदार आहे. फक्त आवाज वापरून सगळं ऊभ करायचं हे एक कलाकार म्हणून खूप आव्हानात्मक आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading