राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त राशन किट वाटप

पुणे: काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहर युवक काँग्रेसच्या वतीने विविध स्तुत्य उपक्रम आयोजित करण्यात आले. वडगाव शेरी विधानसभेत गरजू माता-भगिनींना व तृतीयपंथीयांना या कोरोनाच्या संकट काळात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याची दाखल घेवून आज राहुल शिरसाट, अभिजीत साळवे व युवक काँग्रेसच्या वतीने त्यांना ‘राशन किट’ देण्यात आले.

या उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, राजेंद्र नाना शिरसाट-माजी नगरसेवक, युवा नेते नारायण गलांडे, अमीर शेख- विद्यार्थी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष, सतीश मुळीक, युनूस शेख – वरिष्ठ पोलीस निरीक्षक, निलेश मस्के – अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना समिती पुणे, ब्लॉक अध्यक्ष रमेश सकट, विल्सन चंदेलवाल, संकेत गलांडे, विठ्ठल गायकवाड, ललिता जगताप आदी कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन अभिजीत साळवे, पुणे शहर चिटणीस – युवक काँग्रेस यांनी केले होते.

Leave a Reply

%d bloggers like this: